संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय बी. कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या “मेंटॉर बोर्ड” कमिटीवर निवड.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय बी. कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या “ मेंटॉर बोर्ड ” कमिटीवर निवड. जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ , लोणेरे , महाराष्ट्र , विद्यापीच्या “ फोरम ऑफ इनोव्हेशन , इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ ” “ मेंटॉर बोर्ड ” कमिटीवर ’ “ मेंटॉर ” म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे , विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांची निवड झाली आहे. डॉ. नविन खंडारे , मुख्य कार्यकारी अधिकारी, फोरम ऑफ इनोव्हेशन , इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ , बाटू , विद्यापीठ यांनी इमेल पाठून अभिनंदन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त , विनायक भोसले , इन्स्टिट्यूटचे प्राचार्य , डॉ. विराट गिरी यांनी निवड झाल्या बद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. प्रा. अजय कोंगे हे केंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता योजनांचे संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात २०१६ पासून कार्यरत आहेत. त्यांनी शासकीय कौशल्य विकास आणि उद्योजकीय योजना ...