कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग Skill Development & Entrepreneurship.

 


कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग     :

केंद्र आणि राज्य सरकारने सुरू केलेला "राष्ट्रीय कौशल्य विकास कार्यक्रम" हा आपल्या देशातील  युवकांना आवश्यक कौशल्ये देऊन त्यांना सक्षम बनवण्यासाठी काम करत आहे.   जेणेकरून ते राष्ट्राच्या प्रगतीमध्ये योगदान देणाऱ्या रोजगारक्षम तरुणांमध्ये बदलतील.  संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात इन्स्टिट्यूटमधील कौशल्य विकास आणि उद्योजकता सेल युवकांना सरकारी अनुदानित कौशल्य अभ्यासक्रम मोफत उपलब्ध करून देत आहे.  संप्रेषण कौशल्ये, उद्योजकीय कौशल्ये, व्यवसाय निर्मिती कौशल्ये, व्यक्तिमत्व विकास, 
इंग्रजी संभाषण कौशल्ये, वेळ व्यवस्थापन कौशल्य, प्रेरणा कौशल्य, संगणक कौशल्ये,  तांत्रिक  कौशल्य, जीवन कौशल्ये, आरोग्य आणि निसर्गाबद्दल जागरूकता, सुरक्षितता कौशल्य, मुलाखत कौशल्ये, व्यवस्थापन कौशल्य. यांसारखे विविध अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण देवून रोजगार आणि स्वयंरोजगार निर्मितीसाठी परिपूर्ण मार्गदर्शन केलेजात आहे. उद्योग निर्मिती, स्टार्ट-अप, इत्यादींसाठी 'मुद्रा योजना' सारख्या विविध सरकारी अर्थसाह्य  योजनांची माहित आणि मार्गदर्शन दिलेजात आहे.  या विभागाला कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील  एसएससी किंवा एचएससी आणि पदवीधर बेरोजगार विद्यार्थी इत्यादींकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळत आहे.

प्रा. अजय बी. कोंगे 
 (एम. ए. एम.एड.)
प्रमुख समन्वयक,
कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, एस.जी.पी. 
 


Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)