.

संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये  "जागतिक महिला दिन"  मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न...



Prof. Ajay B. konge @Blogger 08 March 23 :   संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे  कॉलेजमध्ये जागतिक महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करून महिलां आणि  विद्यार्थीनी साठी मार्गदर्शन पर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  महिला दिन कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक  सौ. राणी बाळासाहेब पाटील ह्या उपस्थित  होत्या.  कार्यक्रमाचे उद्घाटन   प्राचार्य,  विराट गिरी  यांच्या हस्ते झाले.  मार्गदर्शन करताना  प्रा. गिरी यांनी जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन महिलानी  कोणकोणत्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे.   त्यांच्या कार्यास उजाळा देऊन प्रत्येक स्त्री सक्षम झाली पाहिजे आपण स्वतः आत्मनिर्भर होऊन देशाचा सर्वांगीण विकास होईल. या उद्देशाने कार्य करीत राहिले पाहिजे. प्राचार्य गिरी यांनी लता करे  या महिलेचे  उदाहरण  देऊन  उपस्थित  महिला विद्यार्थिनीना महिलांच्या कार्याविषयी  मार्गदर्शन  केले.


कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक कर्तव्यदक्ष महिला, यशदा  मार्गदर्शक  राणी बाळासाहेब पाटील महिलांच्या जीवनावरील सत्य उदाहरणे देऊन महिलांमध्ये  महिला सशक्तिकरण, महिलांचा सर्वांगीण विकास, महिलांची नेतृत्व, आईचे महत्व,   आई-वडिलांचे संस्कार अंगी बाळगून भारताच्या सक्षम महिला नागरिक आपल्याला तयार व्हायचे आहे.   देशाचे आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगती आपल्या हातामध्ये आहे.  त्यासाठी नाती जपणे अत्यंत महत्त्वाचे आहे. मार्गदर्शनात  विविध उदाहरणे देवून महिला व विद्यार्थीनिंचे प्रबोधन केले आहे.    राणी पाटील यांना अनेक पुरस्कार प्राप्त जाहलेले असून महिला सबलीकरणासाठी अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याबरोबरच राज्यभर विविध ठिकाणी व्याख्याने देऊन महिला सशक्तिकरण करण्याचे सामाजिक कार्य करत आहेत.


या कार्यक्रमात मार्गदर्शक पाहुण्यांचा  परिचय  प्रा. सुभांगी महाडिक,   सूत्रसंचालन   श्रुती काळे, राधिका पाचेरवाल,  आभार  प्रा. रईसा मुल्ला यांनी केले आहे.


 जागतिक महिला दिन मार्गदर्शन कार्यक्रमास  संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष  संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या. 






Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)