Posts

Basic safety

Image

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये "राष्ट्रीय स्तरावरील युरेका २५ प्रोजेक्ट" स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये "राष्ट्रीय स्तरावरील युरेका २५  प्रोजेक्ट" स्पर्धेचे यशस्वी आयोजन कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्यामध्ये  राष्ट्रीय स्तरावरील ‘युरेका २५ प्रोजेक्ट स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले. डिप्लोमा इंजिनिअरिंग अंतिम वर्ष विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रोजेक्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रातून ३८० हून अधिक प्रोजेक्ट घेऊन  १५००  विद्यार्थी उपस्थित होते. या राष्ट्रीय स्पर्धेचे उद्घाटन इन्स्टिट्यूट चे संचालक, डॉ. विराट व्ही. गिरी यांनी फीत कापून केले यावेळी सर्व विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक,  स्पर्धक, इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी उपस्थित होते.   पश्चिम महाराष्ट्रातील इंजिनिअरिंग कॉलेजचे आणि इंडस्ट्रीमधील अनुभवी व तज्ञ परीक्षक म्हणून  इलेक्ट्रोसाल हाय-टेक प्रायव्हेट लिमिटेड, निपाणी चे सीईओ तुळसिदास साळुंखे, अल्फा क्वेस्ट एंजल्स व्हेंचर चे सीईओ, राहुल सातपुते, लाईव्ह टेक इंडिया चे संचालक, प्रशांत साळुंखे, सॉफ्ट टेक कॉम्प्युटिंग ट्रेनिंग इन्स्टिट्यूट च्या संस्थापक सौ. अल्मास एस. श...

टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे आयोजन

Image
टाटा मोटर्समध्ये अप्रेंटिससाठी सुवर्णसंधी – संजय घोडावत आय.टी.आय. मध्ये 26 मार्च रोजी मुलाखतीचे आयोजन कोल्हापूर: संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या आय.टी.आय. विभागाच्या वतीने कोल्हापूर जिल्ह्यातील आय.टी.आय. उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी तसेच सध्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी अप्रेंटिसशिपची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. टाटा मोटर्स, पुणे येथे अप्रेंटिस म्हणून काम करण्याची ही उत्तम संधी असून इच्छुक विद्यार्थ्यांसाठी २६ मार्च २०२५ रोजी मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. या संधीचा अधिकाधिक विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी यांनी केले आहे. मुलाखतीचे आयोजन सकाळी 9 वाजता संजय घोडावत आय.टी.आय. विभाग, अतिग्रे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर येथे करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे घेऊन उपस्थित राहावे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आय.टी.आय. विभागाचे प्राचार्य, स्वप्निल थिकने, अविनाश पाटील, सुजित मोहिते आणि इतर संपूर्ण स्टाप विशेष परिश्रम घेत  आहेत. संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन, संजयजी घोडावत, वि...

उद्योजकतेला भरारी द्या – नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे हात व्हा! प्रा. अजय बी. कोंगे

Image
उद्योजकतेला भरारी द्या – नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे हात व्हा!   प्रा. अजय बी. कोंगे कोल्हापूर : सध्या तरुणाई मोठ्या प्रमाणावर नोकरीच्या शोधात असते, मात्र उद्योजकतेला चालना देणे ही काळाची गरज आहे.  "नोकरी शोधणारे नव्हे, नोकरी देणारे हात व्हा"  हा संदेश देत प्रा. अजय बी. कोंगे यांनी युवकांना उद्योगक्षेत्रात उतरण्याचे आवाहन केले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ नोकरी मिळवण्यावर भर न देता स्वतःचा व्यवसाय उभा करण्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. नवउद्योजकांसाठी सरकारी योजना, स्टार्टअप धोरणे आणि मार्गदर्शन उपलब्ध आहे. इच्छाशक्ती, जिद्द आणि मेहनत या त्रिसूत्रीच्या जोरावर कोणताही तरुण उद्योजक बनू शकतो. प्रा. कोंगे म्हणाले की, "तरुणांनी आपल्या कौशल्याचा योग्य वापर करून स्वतःचा व्यवसाय सुरू करावा. आजच्या काळात माहिती तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया उद्योग, ई-कॉमर्स, सेवा क्षेत्र आदींमध्ये प्रचंड संधी आहेत. नवीन कल्पना आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून नवउद्योजक भरारी घेऊ शकतात." केंद्र व राज्य सरकारच्या 'स्टार्टअप इंडिया', 'मुद्रा योजना', 'स्...

दहावी आणि बारावीनंतर करिअर मार्गदर्शन: विविध शैक्षणिक शाखा आणि उपयुक्त क्षेत्रे

दहावी आणि बारावीनंतर करिअर मार्गदर्शन: विविध शैक्षणिक शाखा आणि उपयुक्त क्षेत्रे दहावी आणि बारावीनंतर पुढील शिक्षणाची योग्य निवड करणे हे भविष्यातील यशाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. अनेक शैक्षणिक शाखा आणि करिअरचे पर्याय उपलब्ध असल्यामुळे योग्य मार्ग निवडण्यासाठी तुमच्या आवडी, क्षमतांचा विचार करणे गरजेचे आहे. खाली विविध शाखा आणि त्यातील संधी यांची माहिती दिली आहे. १. विज्ञान शाखा (Science Stream) बारावीनंतर उपलब्ध पर्याय: जर तुम्हाला विज्ञानात रस असेल आणि गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा जीवशास्त्र आवडत असेल, तर खालील पर्याय निवडू शकता: A) अभियांत्रिकी (Engineering) ▶  प्रमुख अभ्यासक्रम:  B.E. / B.Tech. ▶  उप-शाखा:  संगणक, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, एआय आणि डेटा सायन्स, एरोनॉटिकल, बायोटेक्नॉलॉजी, केमिकल इंजिनिअरिंग इ. ▶  संधी:  सरकारी व खाजगी क्षेत्रातील नोकऱ्या, संशोधन, स्टार्टअप्स. ▶  प्रवेश परीक्षा:  JEE Main, JEE Advanced, MHT-CET, BITSAT. B) वैद्यकीय (Medical) ▶  प्रमुख अभ्यासक्रम:  MBBS, BDS (डेंटल), BAMS (आयुर्वेद), BHMS (...

विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत कौशल्य विकसित करण्यासाठी कृती कार्यक्रम

विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत कौशल्य विकसित करण्यासाठी कृती कार्यक्रम राबविण्याचे निर्देश राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता आणि संख्याज्ञान कौशल्य विकसित करण्यासाठी शासनाने विशेष कृती कार्यक्रम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत (Nipun Maharashtra Abhiyan) हा कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश पुणे जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (माध्यमिक) डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी दिले आहेत. शाळांनी घ्यायची पुढील पावले: शिक्षक आणि पालकांची विशेष बैठक घेऊन कृती कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार नियोजन करून अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर द्यावा. विद्यार्थ्यांना समजून घेण्यासाठी नवीन अध्यापन पद्धती आणि उपक्रम राबवावेत. शाळा व्यवस्थापनाने दिलेल्या कालावधीत अपेक्षित ध्येय पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी. विद्या समीक्षा केंद्राची भूमिका: राज्यात विद्या समीक्षा केंद्र (VSK) कार्यान्वित करण्यात आले असून, त्याअंतर्गत खालील बाबींवर लक्ष ठेवले जाणार आहे: विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवणे. शैक्षणिक व भौतिक उपक्रमांचे राज्यस...

जागतिक महिला दिन

Image
जागतिक महिला दिन (International Women's Day) ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या हक्कांचे संरक्षण, समानता आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचा सन्मान करण्यासाठी जगभरात साजरा केला जातो. इतिहास आणि महत्त्व जागतिक महिला दिनाची सुरुवात १९०८ मध्ये झाली, जेव्हा अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात महिलांनी कामाच्या सुधारित अटींसाठी आंदोलन केले. त्यानंतर १९१० मध्ये कोपनहेगन (डेन्मार्क) येथे आंतरराष्ट्रीय समाजवादी महिला परिषदेत क्लारा झेटकिन यांनी महिला दिन साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला, जो नंतर अनेक देशांनी स्वीकारला. १९७५ मध्ये संयुक्त राष्ट्रांनी (UN) ८ मार्च हा दिवस अधिकृतपणे जागतिक महिला दिन म्हणून मान्य केला आणि त्यानंतर प्रत्येक वर्षी हा दिवस विविध थीम्ससह साजरा केला जातो. महिला दिनाची थीम (Theme) दरवर्षी संयुक्त राष्ट्र (UN) एका विशेष संकल्पनेसह महिला दिन साजरा करते. या थीम महिला सबलीकरण, समानता, नेतृत्व, आणि शिक्षण यांसारख्या विविध विषयांवर प्रकाश टाकतात. महिलांचे योगदान आणि सशक्तीकरण शिक्षण: ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५ महोत्सव उत्साहात संपन्न

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘उमंग २के२५  महोत्सव उत्साहात संपन्न कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२४-२५  उमंग २के२५ हा वार्षिक सांस्कृतिक महोत्सव मोठ्या जल्लोषात संपन्न  झाला आहे.  या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले,  इन्स्टिट्यूटचे संचालक, डॉ. विराट गिरी,  सांस्कृतिक कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. सुहास पाटील, सौ. समता तेलंग सर्व विभागाचे विभाग प्रमुख, सर्व इव्हेंट समन्वयक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विश्वस्त विनायक भोसले मार्गदर्शन करताना म्हणाले विद्यार्थी मित्रांनो चौकटी बाहेर येऊन स्वतःला ओळखणं अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टिकोनातून  विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यामध्ये स्वयंउस्फुर्त  सहभाग नोंदवून आपले कौशल्य विकसित करून ऐच्छिक उद्देशा पर्यंत पोहोचण्यासाठी या विविध गोष्टींची आवश्यकता असते आणि ती संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात सर्व विभागातून विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न केला जातो. संचाल...

राष्ट्रीय सुरक्षा दिवस

Image
"औद्योगिक सुरक्षा: एक चळवळ"   सुरक्षा या शब्दाचा सर्वसाधारण अर्थ रक्षण करणे अर्थात काळजी घेणे असा होतो. दैनंदिन जीवनात काम करताना त्यासाठी वापरावयाचा साधनांचा विचार केला जातो ते काम  निर्धोक होण्यासाठी जी कार्यपद्धती वापर करायची म्हणजेच सुरक्षा अर्थात सुरक्षितता.  सुरक्षा ही बाब मानवी जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांसाठी आवश्यक आहे आणि आपणअंगीकार देखील केलेला असतो किंवा कळत नकळत करत असतो जसे आपण ऊन, वारा, पाणी, थंडी इत्यादीपासून सुरक्षित राहण्यासाठी सकस अण्णा  बरोबरच वस्त्र निवारा ह्या सुरक्षिततासाठी आपल्याला आवश्यक वाटतात आणि ही बाब पण जन्मापासून पाळत आलेले असतो.  औद्योगिक सुरक्षा बाबतचा विचार करताना ही काही वेगळी बाब आहे असे त्याकडे न बघता आपल्या जीवन पद्धतीचा एक भाग आहे या दृष्टीकोनातून त्याकडे बघायला हवे .अर्थात त्याचे खास असे महत्त्व आहे कारण औद्योगिक सुरक्षेमध्ये कामगार हा केंद्रबिंदू आहे. उत्पादन प्रक्रियेमध्ये कामगाराचा सिंहाचा वाटा आहे.कामगारां शिवाय देशाचे औद्योगिक प्रगती अशक्य आहे. स्वस्थ आणि सुरक्षित कामगार हे देशाला समृद्ध बनवता...

ऊर्जा क्षेत्रात संशोधन गरजेचे : डॉ. जी. डी. यादवघोडावत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न

Image
ऊर्जा क्षेत्रात संशोधन गरजेचे : डॉ. जी. डी. यादव घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा संपन्न  अतिग्रे: जागतिक आणि भारतातील पारंपारिक ऊर्जा स्त्रोत 2050 पर्यंत संपण्याच्या मार्गावर असतील त्यामुळे अनेक देशांपुढे ऊर्जा शी संबंधित आव्हानांना सामोरे जावे लागेल त्यामुळे येणाऱ्या कळत ऊर्जा क्षेत्रात संशोधनाला संधी असल्याचे मत नॅशनल सायन्स चेअर (भारत सरकार) व माजी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी मुंबईचे, पद्मश्री डॉ. जी डी. यादव यांनी मांडले.       संजय घोडावत विद्यापीठाच्या 1 मार्च रोजी झालेल्या सहाव्या दीक्षांत सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.यादव बोलत होते. त्यांनी पर्यावरणीय बदल, जागतिक तापमान वाढ, नवीन ऊर्जेचे स्रोत, ऊर्जा क्षेत्रातील आव्हाने, जगासमोरील व भारतासमोरील यासंबंधीत आव्हाने, कार्बन उत्सर्जन व ऊर्जा क्षेत्रातील संशोधन या मुद्द्यांवर आपले विचार मांडले. तसेच सरकारने विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी यासाठी विद्यार्थ्यांना इंडस्ट्रियल इंटर्नशिप अनिवार्य करावे, त्यासाठी पाच हजार रुपये स्टायपेंड व मुलींचे शिक्षण फ्री असावे अशी अपेक्ष...