वंजारी समाज
वंजारी हा समाज लढवय्या आहे.मेहनती आहे.या लोकांनी ऊस तोडून जमिनी विकत घेतल्या आहेत.आणि लेकरांच्या शिक्षणासाठी वेळ पडली तर त्याच जमिनी विकल्या आहेत.आज वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. या समाजाला संत भगवानबाबा, वामनभाऊ यांच्यासारख्या संतांचे अधिष्ठान लाभले आहे.आणि राजकिय क्षेत्रात गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा नेता लाभलेला होता.आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं ऋण फेडले पाहिजे यासाठी वंजारी समाजाला त्यांनी वेगळं आरक्षण दिलं.सोबतच इतर ओबीसीतील जातींचेही वर्गीकरण केले.ओबीसीतील या अतिमागास जातींना त्यामुळे फी माफी झाली.वंजारी समाजाला मिळालेल्या २% आरक्षणाचा आणि फी माफीचा असा फायदा झाला की वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जाता आलं.आईबाप शेतात कष्ट करून आपल्या मुलाच्या राहण्याखाण्याची सोय होईल इतपत पैसे आपल्या पोटाला चिमटा काढून पाठवू लागले.वंजारी समाजातील होतकरू मुलांनीही कुठल्याही स्पर्धा परीक्षेत असो किंवा ज्या क्षेत्रात ते उतरतात तिथे आरक्षणातील कट ऑफ ओपन इतकाच असतो. आणि त्यातले त्यात ओपनमधून मेरीट क...