घोडावत इन्स्टिट्यूटचा "११वा वर्धापन दिन नाविन्यपूर्ण उपक्रम" आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला. प्रा अजय बी. कोंगे : नवीनपिढ्यांच्या भविष्याला आकार देणारी शैक्षणिक क्षेत्रामध्ये आपले नाव भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचविलेल्या सौ. सुशिला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टचे संजय घोडावत इन्स्टिट्यूट ही शैक्षणिक संस्था म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील शिक्षणकार्याचा आरंभबिंदू आहे. तांत्रिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक चळवळीचे हे स्थापनेपासून व्यासपीठ उभे राहिलेले आहे. असे गौरव उदगार "दीपस्तंभ फाउंडेशन व मनोबल संस्थेचे संस्थापक" मा. श्री. यजूर्वेंद्र महाजन यांनी काढले. इन्स्टिट्युटच्या प्रांगणात वर्धापन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. यजुर्वेंद्र महाजन उपस्थित होते. या वेळी संजय घोडावत विद्यापीठाचे कुलसचिव, डॉ. विवेक कायंदे, प्राचार्य, डॉ. विराट गिरी, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविकात प्राचार्य, डॉ. विराट गिरी यांनी संजय घो...