जीवन आणि समुपदेशन प्रा. अजय बी. कोंगे
अग्रलेख : "आत्मजागृतीची पहाट – नवा दिवस, नवा संकल्प!" प्रा. अजय बबनराव कोंगे मानसशास्त्रीय समुपदेशक "लहान थोर सर्व जागे व्हा!" — ही केवळ आरोळी नाही, तर जीवनाकडे जागृतपणे पाहण्याचं आवाहन आहे. आपण ज्या भूमीत जन्मलो, ती थोर संतांची, ऋषींची, महापुरुषांची, क्रांतिकारकांची आणि शूरवीरांची भूमी आहे. अशा भूमीतील आपले जीवन हे केवळ उपजीविकेसाठी नाही, तर ‘उद्धार’ आणि ‘उत्कर्ष’ यासाठी आहे. म्हणूनच, प्रत्येक भारतीयाला आपले जीवन जागृत होऊन जगावे लागेल. आज आपण एका विचित्र विरोधाभासात जगतो. विज्ञान प्रगत झालं, वैद्यकीय सुविधा वाढल्या, माहिती तंत्रज्ञान क्रांती झाली – तरी माणूस आजारी, अस्वस्थ, चिडचिडा आणि उदास का? मानसिक थकवा, आर्थिक तणाव, शारीरिक व्याधी, नात्यांतील वितुष्ट… हे चित्र खूप विचार करायला लावणारं आहे. आपली सकाळ ८-९ वाजता सुरू होणं, दिवसभर थकाटून, रात्री उशिरापर्यंत मोबाईलशी खेळत राहणं, ही आपली दिनचर्या आपल्याला खऱ्या अर्थाने ‘जिवंत’ ठेवते आहे का? आपण जगत आहोत, पण वास्तवात फक्त 'जगणं चाललंय'. हा निष्क्रियपणा, हा आळस, ही मरगळ आपल्याला जीवनाच्या उद...