"पाटीवरची मैत्री, मॅटवरचा पराक्रम – पप्पू शिरसाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली"
"राजेंद्र उर्फ पप्पू” " पाटीवरची मैत्री , मॅटवरचा पराक्रम – पप्पू शिरसाट यांना भावपूर्ण श्रद्धांजली" लेखक : प्रा. अजय ब. कोंगे शिरसाटवाडी हे नाव पाथर्डी तालुक्यात अनेक जणांसाठी ओळखीचं असेल. पण या गावाला देशपातळीवर क्रीडा क्षेत्रात नाव मिळवून देणाऱ्या एका असामान्य , मित्रप्रेमी आणि खेळाडू व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगायची म्हणजे “राजेंद्र उर्फ पप्पू” शिरसाट. माझ्यासाठी पप्पू फक्त एक खेळाडू नव्हता , तो एक जिवाभावाचा मित्र होता. तो माझ्यापेक्षा दोन वर्षांनी मोठा , पण आमच्यातली मैत्री वयाचं अंतर विसरून गेलेली. एकत्र पोहायला जाणं , वेगवेगळ्या मैदानांवर खडतर सराव करणं , ‘ जय बजरंग व्यायाम शाळा ’ त घोडके मामा यांचं मार्गदर्शन घेऊन कुस्तीचे धडे गिरवणं तालुक्यातील आणि जिल्हातील वेगवेगळ्या गावच्या हंगामा (फडाला) जाणे आमचं बालपण , तारुण्य , आणि मैत्री याच मातीवर घडली. वडिलांचा वारसा , क्रीडाक्षेत्र आवडता छंद पप्पूच्या अंगी खेळाचं बाळकडू त्याच्या वडिलांकडून आलं होतं आदरणीय कै. महादेव शिरसाट सर. शाळा आणि समाज कार्यासाठी झटणारे , विद्यार्थ्यांच्या पा...