आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन
“संजय घोडावत विद्यापीठात”आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन
अतिग्रे – कोल्हापूर


“संजय घोडावत विद्यापीठात”आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन
अतिग्रे – कोल्हापूर सर्व ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच व सदस्य यांना कळविण्यात येते की सोमवार दिनांक २५/०२/२०१९ रोजी ठिक १२.०० वाजता हिवरेबाजार चे सरपंच आदर्शग्रामचे संचालक श्री. पोपटराव पवार यांचे मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन संजय घोडावत विद्यापीठात करण्यात आले आहे. तरी या सुवर्ण संधीचा कोल्हापूर जिल्ह्यातील व परिसरातील ग्रामविकास अधिकारी आणि सरपंच व सदस्यांनी अवश्य लाभ घावा ही नम्र विनंती.
श्री.पोपटराव पवार यांच्या अ:थक प्रयत्नाने तसेच लोकसहभागाच्या आणि सामूहिक श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाचे काम झाल्याने हिवरे बाजार ग्रामपंचायतीस २००९ चा प्रतिष्ठेचा वसंतराव नाईक सामाईक पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. एक शिक्षित माणूस घर बदलू शकतो. एक शिक्षित घर गाव बदलू शकतं हे पोपटराव पवार यांनी सिद्ध करून दाखविले. श्रमदान, चराईबंदी, कुर्हाडबंदी, नशाबंदी, कुटुंबनियोजन या पंचसूत्रीचा वापर करून त्यांनी एक आदर्श गाव निर्माण केला आहे.
तरी सर्वांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती.
वेळ 12.00 वा.
ठिकाण – कॉन्फरन्स हॉल एमबीए ( मनेजमेंट बिल्डिंग )
संपर्क – 9850392462
प्रा. अजय बी. कोंगे
प्रमुख समन्वयक,कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग.
संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर
उन्नत भारत अभियान.