उद्योजकता मार्गदर्शक

 


उद्योजकता मार्गदर्शक :

जोखीम व्यवस्थापक ( रिस्क Risk ) संस्था, तिचे कर्मचारी, ग्राहक, प्रतिष्ठा, मालमत्ता आणि भागधारकांचे हित पहातो यांचे जोखीम (रिस्क Risk ) घ्यवी किंवा नाही यांचे नियोजन करतो. जोखीम संस्थेला धोका ओळखतो, त्यांचे मूल्यांकन करतो आणि काही चूक झाल्यास योजना विकसित करतो. यासह, जोखीम कशी टाळावी, कमी करावी किंवा हस्तांतरित करावी यासाठी देखील उद्योजकता मार्गदर्शक मार्गदर्शन करतात ...

एक उदा. ....
नव उद्योजकाचा उद्योजकता मार्गदर्शकास फोन आला .. अहो सर मी एक टपरी घेऊ का भाडयाने त्या टपरीस अतिशय कमी भाडे आहे., त्यात मी छोटा उद्योग सुरू करतो, मस्त पैकी बिर्याणी पार्सलचा... कमी भाडे आहे, होईल फायदा चटकन...
उद्योजकता मार्गदर्शकांनी त्याला काही प्रश्न विचारले ..
१) ती टपरी किंवा तुझ्या व्यवसायाची जागा अधिकृत आहे का ?
२) तुझ्या कडे पुढील 12 महिने धंदा न होता त्या टपरीचे जागेचे भाडे द्यायचे पैसे आहेत का ?
३) पार्सल साठी ती जागा योग्य आहे का ?
४) तू बिर्याणी कुठे बनवणार आहेस ?
५) त्या भागात बिर्याणी विकली जाऊ शकते का ?
६) होम डिलिव्हरी सुरू करणार असशील तर तू नसताना कोण लक्ष देणार आहे ?
७ ) फक्त बिर्याणी का अजून काही असणार आहे ?
त्याने ऐकले आणि म्हणाला अरे ह्यातील एकही प्रश्नांचा मी विचार केला नव्हता मला ती जागा अतिशय कमी किंमतीत भाड्याने मिळत होती , मी लागलीच प्लॅन केला की करुया बिझनेस , ती जागा अधिकृत नाही हे तो मालक स्वतःच म्हणाला , मीच एकटा असणार आहे सगळे करण्यासाठी ...आता काय करू कळत नाही ..
एकच कर घरातून सुरवात कर ..ऑर्डर साठी डिजिटल माध्यमातून जाहिरात कर , लोकांच्या आधी ऑर्डर घेत मगच बनवत जा..सुरवातीला धावपळ होईल पण नुकसान नाही होणार ..जागेचे भाडे मध्ये पैसे आधी न गुंतवता चांगल्या वस्तू घेण्यात गुंतव ..तांदूळ , तेल , मसाला चांगला वापर कर , काहीही नाव आणि जागा नसताना तुझ्या हातची चव लोकांना पटते का ते बघ ..हल्ली जो तो घरीच मागवतो किंवा सांगू त्या जागेवर येऊन घेऊन पण जाणारा ग्राहक आहे ..ग्राहकांना खुश कर बघ ..नक्कीच बिर्याणी तुझी ओळख करून देईल ..
हो सर नक्कीच तुम्ही सांगितले ते पटले.
व्यवसाय सुरू करणे सोप्पे , पण टिकवणे कठीण , घरातल्या लोकांना बनवलेले जेवण आवडते ह्यावरून लागलीच कॅटरिंग सेवा सुरू करणे म्हणजे मोठी चूक ...
व्यवसाय करायचा मग कुठलीही फ्रेंचायझी घेणे पण चूक ...
व्यवसाय सुरू करण्या अगोदर योग्य व्यक्ती उद्योजकता मार्गदर्शक काकडून मार्गदर्शन घ्या आणि सुरू करू इच्छिणाऱ्या उद्योगात सक्सेस मिळवा...

प्रा अजय बी. कोंगे,
  • प्रमुख समन्वयक, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग संजय घोडावत पॉलिटेक्निक, अतिग्रे- कोल्हापूर.
  • Mentor, महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी मुंबई.
  • Counselor (समुपदेशक) राष्ट्रीय करिअर सेवा कामगार आणि रोजगार मंत्रालय, भारतसरकार.
  • Mentor, भारतीय युवा शक्ती ट्रस्ट: BYST
  • Mentor of change Atal Innovation Mission 

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)