संजय घोडावत विद्यापीठाअंतर्गत ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन शिबीर संपन्न...



संजय घोडावत विद्यापीठाअंतर्गत ऊस तोडणी कामगारांची आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन शिबिर संपन्न...
कोल्हापूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या इनक्युबेशन आणि इनोव्हेशन सेंटर आणि स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्युअरशिप सेल अंतर्गत ऊस तोडणी कामगारांच्या कामाच्या ठिकाणी जाऊन एक दिवसीय आरोग्य तपासणी करून मोफत औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला  मार्गदर्शन शिबिरचे आयोजन करण्यात आले होते.   
जास्त कामाचा ताण तणाव, वेळी-अवेळी जेवण अशा अनेक प्रसंगांतून जात असताना तब्येतीवरही अशा गोष्टीचा परिणाम होत असतो. तरीसुद्धा गरीब परिस्तिथी आणि जीवन जगण्यासाठी दिवस-रात्र अखंड काष्ठ ऊस तोडणी कामगार करत असतात बऱ्याचदा आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. एक बांधिलकी जपत संजय घोडावत विद्यापीठाअंतर्गत या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. बिमल तिवडे, डॉ. अर्जुन पाटील, या शिबिराचे आयोजक प्रा. अजय बी. कोंगे, स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे प्रा. घाटे भाग्यश्री, प्रा. राज गायकवाड विद्यार्थी  विवेक जनाज, वैष्णवी राजपूत, खुशी कट्यार, प्रियंका कित्तुर, साक्षी माने, तिशा अडवाणी, तुषार चुंग, मोहित सबनीस, निखिल अग्रवाल, श्रेया खोत, स्वप्निल कुडाळकर. आरोग्य तपासनी औषध उपचार आणि वैद्यकीय सल्ला मार्गदर्शन कामी विशेष सहकार्य केले.
आजच्या धावपळीच्या जगात आपले आरोग्य चांगले राहणे क्रमप्राप्त आहे. बैठे काम, वेळी-अवेळी जेवण, व्यायामाचा अभाव, फास्टफूड-जंकफूडचे सेवन, तंत्रज्ञानाच्या आहारी जाणे अशा विविध गोष्टीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. त्यावर उपचार करण्यासाठी हजारो रुपये खर्च होतात. शिवाय वेळ जातो आणि मानसिक त्रासही सहन करावा लागतो. त्यामुळे उपचारांपेक्षा प्रतिबंध चांगला हे लक्षात घेऊन आपण नियमित व्यायाम, योग्य आहार आणि वेळोवेळी आरोग्य तपासण्या करणे गरजेचे आहे,’ असे मत उपस्थिताना मार्गदर्शन करताना प्रा. कोंगे यांनी व्यक्त केले.
संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू प्रोफेसर डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डीन डॉ. उत्तम जाधव, इनोवेशन अँड इंक्युबॅशन सेंटरचे संचालक, डॉ. व्ही. व्ही. कुलकर्णी स्कूल ऑफ फार्मसी विभागाचे डीन डॉ. डॉ. श्रीनाथ बी  यांनी या सामाजिक उप्रमास शुभेच्छा दिल्या.



















 

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)