दुसऱ्या
दिवशी सकाळी तालुक्यातील व जिल्ह्यातून आलेले विविध कलाकार आपली पारंपारिक कला
सादर करून ग्रामस्थांची मन जिंकतात त्यामध्ये (त्या कार्यक्रमास हजरी कार्यक्रम
म्हणतात ) कलाकारांनी आपली पारंपारिक कला सदर केल्यास त्या कलेला प्रेरणा देण्यासाठी
गावकरी कलाकारांचा सत्कार करून त्यांना विशिष्ट रक्कम बक्षीस दिले जाते. दुपारी तीन ते पाच राज्यातून
नामांकित पैलवान शिरसाटवाडी गावामध्ये येतात मोठा जंगी ह्गाम्याचे आयोजन केले जाते. विविध ठिकाणाहून आलेले मल्ल आपल्या कसरतीचे
उपस्थित ग्रामस्थांच्या समोर सादरीकरण करत असतात विजयी मल्लांना ग्रामस्थ शंभर रुपये ते दहा हजार रुपयापर्यंत बक्षीस स्वरूपात रक्कम वाटप केली जाते. या तीन दिवशीय
यात्रा उत्सव कार्यक्रमांमध्ये विविध क्षेत्रांमध्ये नोकरी करत असणारे विविध
ठिकाणी स्थापित केलेले उद्योगाचे उद्योजक, नोकरदार वर्ग, उच्च शिक्षणासाठी गेलेले युवक युवती, सर्व आपल्या
गावामध्ये येऊन जेष्ठ नागरिकास आपल्या मित्र परिवारास व आपल्या भावकीतील सर्व
सदस्याना खुशाल्कीचा संदेश देत हितगुंज करून आपुलकीने एकमेकांची विचारपूस करून
एक बंधुभाव जोपासला जातो. शिरसाटवाडी गावामध्ये एक आपुलकीचं नात उपून ठेवतात.
मी
शिरसाटवाडी गावचा भूमी पुत्र नागरिक आहे. त्याचा मला सार्थक अभिमान आहे. शिरसाटवाडी गावातील सुपुत्र उद्योजक तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी पदाधिकारी उच्च पदावर कार्यरत आहे. विविध क्षेत्रांमध्ये उच्च
पदावर अधिकारी आहेत. त्यामध्ये इंडियन
आर्मी, महाराष्ट्र पोलीस,
जिल्हा परिषद शिक्षक,
माध्यमिक शिक्षक,
महाविद्यालयात प्राध्यापक,
वीज महामंडळ, एसटी महामंडळ,
केंद्र व राज्य शासनाचे बीज भांडवल महामंडळ,
कलेक्टर ऑफिस,
जिल्हा परिषद ऑफिस,
महाराष्ट्र शासन मंत्रालय. अशा विविध
क्षेत्रांमध्ये शिरसाटवाडी गावचे सुपुत्र
देश सेवा करत आहेत.
प्रा. अजय बबनराव कोंगे