घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी अंतर्गत शालेय साहित्यांचे वाटप...
घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी अंतर्गत शालेय साहित्यांचे वाटप
जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी या सामाजिक उपक्रमांतर्गत आष्टा जि. प. शाळा नं.०९ वाळवा, सांगली प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असण्याऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्यांचे वाटप करण्यात आले.
या कार्यक्रम प्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी वाळवा श्रीमती. मंगल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. मनिषा मोटकट्टे, शा.व्य. सदस्य श्री. राजाराम देसावळे, मॉडेल स्कुल कमिटी सदस्य श्री. साजिद आयुबखान इनामदार, वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. फरिदा रमजान मकानदार, सहशिक्षक श्री. दयानंद बाळासाहेब लोखंडे, श्री. समीर इसाक नायकवडी, उपशिक्षका सौ. निलम जगदिश साळुंखे, श्रीमती. शाहीन मुजावर, पालक, गावातील ग्रामस्थ आणि संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजन्य वारी आली आपल्या दारी कार्यक्रम समानव्यक प्रा. अजय कोंगे, श्री. आशिष कुलकर्णी, श्री.सचिन देसाई, पूनम शिंदे, एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम समन्वयक, प्रा. अजय कोंगे यांनी उपस्थितांना या कार्यक्रमाविषयी माहिती देऊन विद्यापीठाअंतर्गत विविध उपक्रमाचे मार्गदर्शन केले. प्रा. कोंगे म्हणाले संजय घोडावत विद्यापीठाने सौजन्य वारी आली आपल्या दारी ह्या सामाजिक उपक्रमातून कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यापीठाने दत्तक घेतलेल्या विविध गावांमध्ये जाऊन दहा हजाराहून अधिक गरजू, वयोवृद्ध, उसतोडणी कामगार, गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्यांची मदत पोहोचवली आहे.
प्रा. कोंगे म्हणाले सौजन्य वारी आली आपल्या दारी या सामाजिक रथाचे उद्घाटन करताना संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त मा. श्री. विनायक भोसले यांनी संकल्प केला होता की, हा रथ फक्त उद्घाटन करून थांबणार नसून हा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये जाऊन गरजू लोकांना मदतीचा हात देण्याचे सामाजिक कार्य करणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील आवश्यक ते गाव संपवून सांगली जिल्ह्यातील पहिलाच कार्यक्रम जि. प. मॉडेल स्कूल आष्टा शाळा नं.०९ वाळवा जिल्हा सांगली या ठिकाणी पहिलीच संधी या शाळेने उपलब्ध करून दिल्याबद्दल सर्वाना धन्यवाद दिले. असेच विविध जिल्ह्यातील जि.प. शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच प्रमाणे गरजूंना उपयुक्त साहित्याची मदत कार्य केले जाणार आहे. या सामाजिक कार्यासाठी विद्यापीठातील अधिकारी, पदाधिकारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी आपल्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त त्याचप्रमाणे आपल्या आवडी प्रमाणे या सौजन्य रथाला उपयुक्त साहित्याची मदत करत आहेत. या मदती मुळे या रथाला काम करण्याची गती प्राप्त होत आहे. विद्यापीठाचे विद्यार्थी आणि जि प शाळेतील विद्यार्थीच्या चेहऱ्यावरील आनंद वाखण्याजोगा होता.
विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ. विवेक कायंदे, डीन डॉ. उत्तम जाधव, इनोवेशन अँड इंक्युबॅशन सेंटरचे संचालक, डॉ. व्ही व्ही कुलकर्णी,डॉ. बालाजी के यांनी सामाजिक उपक्रमास शुभेच्छा दिल्या.