एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल.


एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल.

कोल्हापूर : मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात  अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान मुंबई येथे संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी स्वीकारला.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शशिकांत विश्वकर्मा, आय. बी स्कुल, डेव्हलपमेंट असोसिएट मॅनेजर भारत, श्री. सुरेन रामसुब्बू, संचालक अकॅडमिक इंटरनॅशनल स्टडीस, व अनिल शर्मा फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर एज्युकेशन टुडे हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या शाळांना 'एज्युकेशन टुडे ' या संस्थेमार्फत पुरस्कार देण्यात आले.  महाराष्ट्रातील नंबर वन वन डे कम बोर्डिंग विभागातील स्कूलचा मानाचा किताब संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने मिळवला आहे. 

पुरस्काराच्या निमित्ताने विश्वस्त विनायक भोसले यांनी  संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती यांच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, "प्राचार्या मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळेच शाळेला हा गौरव व सन्मान मिळाला आहे."
या प्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उत्कृष्ट निकाल, आणि शिक्षकांचे समर्पण, प्रायोगिक शिक्षणपद्धती, उच्च शिक्षित शिक्षक, जागतिक दर्जाचे शिक्षण  या सर्व गोष्टींमुळे आम्ही हे यश प्राप्त करू शकलो."

चेअरमन श्री संजय घोडावत आणि विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी श्रीमती मोहंती यांच्या शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले. तसेच, बोर्डिंग विभागाचे प्राचार्य डॉ. एच. एम. नवीन,  डे बोर्डिंग स्कूलचे प्राचार्य श्री अस्कर अली, ज्यु कॉलेजचे प्राचार्य नितेश नाडे, शिक्षकवर्ग, विद्यार्थी, आणि पालकांचेही त्यांनी आभार मानले.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)