Posts

Showing posts from 2026

संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात

Image
संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहात “मला हवं ते मी मिळवतो; परंतु ते माझं एकट्याचं यश नसून माझ्यासोबत अहोरात्र परिश्रम करणाऱ्या प्रत्येक सहकाऱ्याच्या विश्वास, निष्ठा आणि सुयोग्य नियोजनाचे फलित आहे.” — चेअरमन संजय घोडावत जयसिंगपूर : शिक्षण, उद्योग आणि समाजसेवा या तिन्ही क्षेत्रांत भक्कम ठसा उमटवणारे संजय घोडावत यांचा वाढदिवस उत्साहपूर्ण वातावरणात आणि विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरा करण्यात आला.  संजय घोडावत विद्यापीठ च्या  प्रांगणात तसेच संजय घोडावत समूहाच्या मुख्य कार्यालयात सकाळपासूनच हितचिंतकांची लक्षणीय उपस्थिती पाहायला मिळाली. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक आणि चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन तसेच समाजमाध्यमांद्वारे शुभेच्छा वर्षाव केल्या. या प्रसंगी सौ. नीता घोडावत, विजयचंद घोडावत, राजेश घोडावत, राकेश घोडावत, सचिव श्रेणिक घोडावत, सौ.सलोनी घोडावत, विश्वस्त  विनायक भोसले, कुलगुरू  डॉ. उद्धव भोसले, रजिस्ट्रार डॉ. विवेक कायंदे, संचालक डॉ. विराट व्ही. गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. शुभेच्छापर भाषणात विश्वस्त विनायक भोसले यांनी...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  ‘इनो क्वेस्ट २के २६’ नाविन्यपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन कोल्हापूर :अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये  “इनो क्वेस्ट २के२६” नाविन्यपूर्ण कल्पना, प्रकल्प प्रदर्शनाचे आयोजन सोमवार, २ मार्च २०२६ रोजी करण्यात आले आहे. संस्थेच्या ‘संस्थात्मक नवोपक्रम परिषदे’च्या (आयआयसी) पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या नाविन्यपूर्ण कल्पना, संशोधनवृत्ती आणि तांत्रिक कौशल्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. या प्रदर्शनात महाराष्ट्र राज्यातील विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी आपले अभिनव प्रकल्प आणि कल्पना सादर करणार आहेत. उद्योगाभिमुख विचारसरणी, नवउद्योजकता संस्कृती आणि नवोपक्रमांना चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी सांगितले. स्पर्धांमध्ये ‘इनोव्हाट्रिक्स’, ‘आयडीया पिचिंग स्पर्धा’, ‘टेक्नोव्हर्स टेक-पेस्ट’, ‘पोस्टर एक्स प्रो’ आणि ‘टेक रोबस्टा’ या प्रमुख विभागांचा समावेश आहे. ‘इनोव्हाट्रिक्स’ अंतर्गत ‘सर्किट्रिक्स’ आणि ‘इनोव्हेटर्स अरेना...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूट ग्रीन कॅम्पस मध्ये स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त २७ फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता शिवजन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा केवळ उत्सव नसून विद्यार्थ्यांमधील शौर्य, नेतृत्वगुण, स्वाभिमान आणि कर्तृत्व जागवणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. वक्तृत्व, निबंधलेखन, चित्रकला, देशभक्तीपर गीतगायन अशा विविध स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना आपले विचार, कौशल्ये आणि सर्जनशीलता सादर करण्याची संधी मिळणार आहे. महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यातून प्रेरणा घेत प्रत्येक विद्यार्थ्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन  सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख समन्वयक प्राध्यापक सुहास पाटील, प्राध्यापिका भाग्यश्री भालकर यांच्याकडून करण्यात आले आहे. सहभागातून आत्मविश्वास वाढतो, स...

“ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर रहा”लेखक – प्रा. अजय बी. कोंगे

Image
“ज्यांना आपली किंमत नाही, त्यांच्यापासून दूर रहा” लेखक – प्रा. अजय बी. कोंगे माणसाच्या आयुष्यातील सर्वात मोठा प्रश्न कोणता असेल तर तो म्हणजे — स्वतःची किंमत ओळखणे. जगात प्रत्येक वस्तूची, प्रत्येक कलेची, प्रत्येक व्यक्तीची एक वेगळी किंमत असते. परंतु ही किंमत सर्वांनाच समजेल असे नाही. म्हणूनच ज्यांना आपले मूल्य कळत नाही, त्यांच्याकडून मान्यता मिळवण्याच्या प्रयत्नात आयुष्य वाया घालवू नये. एका प्रेरणादायी कथेत वडील आपल्या मुलाला एक जुने घड्याळ देतात. ते जवळपास दोनशे वर्षे जुने असते. ते विकण्याचा सल्ला देताना वडील मुलाला वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन त्याची किंमत विचारायला सांगतात. दागिन्यांच्या दुकानात त्या घड्याळाला फारशी किंमत मिळत नाही; भंगाराच्या दुकानात तर ती किंमत आणखी कमी होते. पण जेव्हा तेच घड्याळ संग्रहालयात नेले जाते, तेव्हा त्याचे ऐतिहासिक आणि सांस्कृतिक मूल्य ओळखून लाखो रुपयांची ऑफर मिळते. ही कथा केवळ घड्याळाची नाही; ती आपल्या आयुष्याची आहे. आपण कोणत्या ठिकाणी उभे आहोत, कोणत्या लोकांमध्ये वावरतो, आणि कोण आपल्याकडे कशा नजरेने पाहतो — यावर आपल्या किंमतीचा अंदाज लावला जातो. ...

वंजारी समाज

Image
वंजारी हा समाज लढवय्या आहे.मेहनती आहे.या लोकांनी ऊस तोडून जमिनी विकत घेतल्या आहेत.आणि लेकरांच्या शिक्षणासाठी वेळ पडली तर त्याच जमिनी विकल्या आहेत.आज वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब व्यक्तीला शिक्षणाचं महत्त्व समजलेलं आहे. या समाजाला संत भगवानबाबा, वामनभाऊ यांच्यासारख्या संतांचे अधिष्ठान लाभले आहे.आणि राजकिय क्षेत्रात गोपीनाथ मुंडे साहेबांसारखा नेता लाभलेला होता.आपण ज्या समाजातून येतो त्या समाजाचं ऋण फेडले पाहिजे यासाठी वंजारी समाजाला त्यांनी वेगळं आरक्षण दिलं.सोबतच इतर ओबीसीतील जातींचेही वर्गीकरण केले.ओबीसीतील या अतिमागास जातींना त्यामुळे फी माफी झाली.वंजारी समाजाला मिळालेल्या २% आरक्षणाचा आणि फी माफीचा असा फायदा झाला की वंजारी समाजातील गरीबातल्या गरीब मुलांना व्यावसायिक शिक्षणासाठी बाहेरगावी जाता आलं.आईबाप शेतात कष्ट करून आपल्या मुलाच्या राहण्याखाण्याची सोय होईल इतपत पैसे आपल्या पोटाला चिमटा काढून पाठवू लागले.वंजारी समाजातील होतकरू मुलांनीही कुठल्याही स्पर्धा परीक्षेत असो किंवा ज्या क्षेत्रात ते उतरतात तिथे आरक्षणातील कट ऑफ ओपन इतकाच असतो. आणि त्यातले त्यात ओपनमधून मेरीट क...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात संपन्न अतिग्रे, कोल्हापूर : उद्योजकतेची बीजे रुजविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ व भाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इनोव्हेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे “आयडिया जनरेशन आणि स्टार्टअप” या विषयावर एकदिवसीय मार्गदर्शन कार्यशाळा  अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडली. या कार्यशाळेत एकूण २६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विविध विभागांतील ३० संघांनी आपापली समस्या निवेदने (प्रॉब्लेम स्टेटमेंट) शॉर्टलिस्ट करून त्यांचे प्रभावी सादरीकरण केले. विद्यार्थ्यांच्या कल्पकता, सर्जनशीलता आणि सामाजिक भान यांचे उत्कृष्ट दर्शन या सादरीकरणांतून घडले. कार्यशाळेची सर्व उद्दिष्टे यशस्वीरित्या पूर्ण झाली. कार्यशाळेचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुधीर एम. अराळी,  सीईओ, के आय टी इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशन, कोल्हापूर  यांनी विद्यार्थ्यांना स्टार्टअप उभारणीची संकल्पना, समस्या ओळख व त्यावर उपाययोजना, व्यवसाय मॉडेल कॅनव्हास, निधी स...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ‘SGAiRC’ “एआय संशोधन केंद्राचे उद्घाटन” आणि ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’चे यशस्वी आयोजन कोल्हापूर : अतिग्रे  येथील संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजय घोडावत एआय संशोधन केंद्र (SGAiRC) चे उद्घाटन मंगळवार, दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता सी-ब्लॉक येथील सेमिनार सभागृहात संपन्न झाले. या उद्घाटन समारंभास संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. याच दिवशी “इंडिया एआय अभियान”  सर्वांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता या संकल्पनेवर आधारित पूर्व संमेलन कार्यक्रम ‘एआय इम्पॅक्ट समिट २०२६’ चे ही उत्साहात आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात नामवंत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञांनी सहभाग घेत विद्यार्थ्यांना व प्राध्यापकांना  कृत्रिम बुद्धिमत्ता, नवसंकल्पना, संशोधनाच्या संधी तसेच भारतातील एआयचे भवितव्य याविषयी सखोल मार्गदर्शन केले.  प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. श्रुती पाटील संचालिका, सिम्बायोसिस कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था, पुणे, श्री. हर्ष...

"Hazard आणि Risk : औद्योगिक सुरक्षिततेचा पाया" प्रा. अजय बी. कोंगे

Image
Hazard आणि Risk : औद्योगिक सुरक्षिततेचा पाया (Industrial Safety – Academic Article) प्रस्तावना औद्योगिकीकरणामुळे उत्पादनक्षमता वाढली असली, तरी त्याचबरोबर अपघात, आजारपण आणि जीवितहानीचे धोकेही वाढले आहेत. या सर्व धोके समजून घेण्यासाठी आणि नियंत्रित करण्यासाठी Hazard (धोका निर्माण करणारा घटक) आणि Risk (त्या धोक्यामुळे होणारी संभाव्य हानी) या संकल्पना औद्योगिक सुरक्षिततेचा पाया मानल्या जातात. इंडस्ट्रियल सेफ्टी विद्यार्थ्यांसाठी या दोन संकल्पनांचे स्पष्ट आकलन अत्यावश्यक आहे. Hazard म्हणजे काय? Hazard म्हणजे अशी कोणतीही परिस्थिती, वस्तू, प्रक्रिया किंवा कृती जी मानवाला इजा, आजार, मालमत्तेचे नुकसान किंवा पर्यावरणाची हानी करू शकते. 👉 सोप्या शब्दात: Hazard = अपघात घडवू शकणारे कारण Hazard चे प्रकार Physical Hazard (भौतिक धोके) आवाज (Noise) उष्णता व थंडी कंपन (Vibration) प्रकाशाचा अभाव उंचावरून पडण्याचा धोका Chemical Hazard (रासायनिक धोके) विषारी वायू ज्वलनशील द्रव्ये आम्ल व क्षार धूर, वाफ, धूळ Mechanical Hazard (यांत्रिक धोके) फिरती यंत्रे कटिंग टूल्स गिअर, बेल्ट, पुली अपुरे मश...

घोडावत विद्यापीठात १७१ संशोधकांचा सहभाग

Image
शाश्वत विकासावर आंतरराष्ट्रीय परिषद उत्साहात घोडावत विद्यापीठात १७१ संशोधकांचा सहभाग  कोल्हापूर आतिग्रे : संजय घोडावत विद्यापीठात इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन सस्टेनेबल हेल्थकेअर, फूड सायन्स अँड एनर्जी (ICSHFE) २०२६  ही दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद  उत्साहात पार पडली. यामध्ये 171 संशोधकांनी सहभाग नोंदवला. तर 34 संशोधकांनी पेपर सादरीकरण केले. स्कूल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस, स्कूल ऑफ सायन्सेस व स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले.    परिषदेसाठी फार्मसी, आरोग्य व संलग्न विज्ञान, अप्लाइड नॅनोमटेरियल्स तसेच लाईफ सायन्सेस या तीन प्रमुख विषयांतर्गत पदवी व पदव्युत्तर विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक तसेच उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग होता. विशेष म्हणजे सहभागींपैकी ७० टक्क्यांहून अधिक महिला संशोधक होत्या. यावेळी ४५ पोस्टर सादरीकरणे करण्यात आली. तसेच एका स्टार्ट अपद्वारे नव उत्पादनाचे प्रदर्शनही करण्यात आले.    परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी  कुलगुरू प्रा. उद्धव भोसले व विश्वस्त विनायक भोसले यांनी मार्गदर्...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत यश

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्याचे मिस्टर इंडिया बॉडीबिल्डिंग स्पर्धेत  यश कोल्हापूर प्रतिनिधी : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात तृतीय वर्षात शिक्षण घेत असणाऱ्या धिरज प्रभुनाथ होळकुंदे याने “राष्ट्रीय स्तरावर संस्थेचे नाव उज्वल केले आहे. ‘साउथ आशिया बॉडी बिल्डिंग असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेली मिस्टर इंडिया बॉडी बिल्डिंग स्पर्धा’ जानेवारी २०२६ रोजी बंगळुरू, कर्नाटक येथे पार पडली. या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत देशभरातून १५० पेक्षा अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा १८५ सें.मी. व त्यापेक्षा अधिक उंचीच्या गटात घेण्यात आली असून, अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत धीरज होळकुंदे याने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक पटकावला. या उल्लेखनीय यशाबद्दल त्याला ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि पदक देऊन सन्मानित करण्यात आले. या यशाबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना धिरज होळकुंदे म्हणाला की, “संजय घोडावत इन्स्टिट्यूटमधील अत्याधुनिक जिम सुविधा, तसेच जिममधील मार्गदर्शक सचिन बागडी यांचे मोलाचे मार्गदर्शन मला सतत प्रेरणा देत राहिले. याशिवाय माझे आई-वड...

लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारचा पद्मश्री सन्मान...

Image
लोककलेला मिळालेली संजीवनी : रघुवीर खेडेकर यांचा पद्मश्री सन्मान भारतीय लोकसंस्कृतीच्या समृद्ध परंपरेत तमाशा ही केवळ एक करमणुकीची कला नसून ग्रामीण जीवनाची संवेदना, संघर्ष आणि उत्सव यांचे जिवंत प्रतिबिंब आहे. या लोककलेला जिवंत ठेवण्यासाठी ज्यांनी आयुष्य वेचले, अशा लोकनाट्य तमाशा क्षेत्रातील ज्येष्ठ व दिग्गज कलाकार रघुवीर खेडेकर यांना भारत सरकारतर्फे २०२६ चा पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. तमाशा या लोककला प्रकारातील त्यांच्या प्रदीर्घ, निष्ठावंत आणि समर्पित योगदानाची ही योग्य पावती असून, या घोषणेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे. गेल्या चार दशकांहून अधिक काळ रघुवीर खेडेकर यांनी तमाशा रंगभूमीवर अखंडपणे कार्य केले आहे. त्यांच्या कार्याची मुळे केवळ रंगमंचापुरती मर्यादित नसून, तमाशा या लोककलेच्या जतन, संवर्धन आणि नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या ध्येयाशी घट्ट जोडलेली आहेत. त्यांच्या मातोश्री आई कातांबाई सातारकर यांनी स्वबळावर सुरू केलेला तमाशा फड त्यांनी अत्यंत जिद्द, कष्ट आणि चिकाटीने आजतागायत यशस्वीपणे सांभाळला आहे. ही परंपरा पुढे नेणे हे त्यांच्या आयुष...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “रस्ता सुरक्षा” अभियानांतर्गत जाणीव जागृती मार्गदर्शन कार्यक्रम कोल्हापूर, अतिग्रे : रस्ता अपघातांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी व तरुण पिढीत रस्ता सुरक्षेबाबत जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे रस्ता सुरक्षा अभियान २०२६ अंतर्गत जाणीव जागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.  इचलकरंजी परिवहन विभागाचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्री. विजय इंगवले,  सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी  अंकिता वांडेकर,  सहाय्यक निरीक्षक श्री. अजिंक्य डुबल,  सहाय्यक निरीक्षक  अनुसया माळी,  निरीक्षक. कुलकर्णी इन्स्टिट्यूटचे  संचालक डॉ. विराट गिरी, विद्यार्थी उपस्थित होते. मार्गदर्शन करताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी  इंगवले यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अत्यंत उदाहरणासह  अधोरेखित केले. ते म्हणाले, “रस्ता सुरक्षा नियमांचे पालन केल्याने केवळ शासकीय दंड टळत नाही, तर स्वतःच्या व इतरांच्या अमूल्य प्राणांचेही संरक्षण होते.” विद्यार्थ्यांकडे देशाच्या भवितव्याची धुरा असल्याचे नमूद करत त्यांनी स...

“संकट अचानक येते, पण तयारी जीवन वाचवते”

Image
"संकट अचानक येते, पण तयारी जीवन वाचवते” सुरक्षिततेचा मूलमंत्र: संकट कधी, कुठे आणि कोणत्या स्वरूपात येईल, हे सांगता येत नाही. तो अचानक येतो—अपघात, आग, वीजधक्का, रासायनिक गळती, यंत्रातील बिघाड किंवा नैसर्गिक आपत्ती अशा कोणत्याही रूपात. मात्र एक गोष्ट निश्चित आहे की योग्य नियोजन, शिस्तबद्ध कामपद्धती आणि पूर्वतयारी असेल, तर तोच खतरा जीवघेणा न ठरता नियंत्रित करता येतो. म्हणूनच “संकट (खतरा) अचानक येतो, पण तयारी जीवन वाचवते” हे वाक्य केवळ घोषवाक्य नसून जीवनरक्षक तत्त्वज्ञान आहे. आजच्या औद्योगिक, शैक्षणिक,  जीवन जगताना व बांधकाम क्षेत्रात सेफ्टी इंजिनियरची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. सुरक्षित कार्यसंस्कृती रुजवणे, धोके ओळखणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यापासून संरक्षणाची प्रभावी व्यवस्था उभारणे हे सेफ्टी इंजिनियरचे मूलभूत कर्तव्य आहे. सुरक्षितता ही केवळ नियमांची पूर्तता नसून ती मानवी जीवनाच्या संरक्षणाची जबाबदारी आहे. नियोजन आणि संकल्पना सुरक्षिततेचे पहिले पाऊल म्हणजे जोखीम मूल्यांकन (Risk Assessment). कोणत्या कामात कोणते धोके संभवतात, त्यांची तीव्रता किती आहे आणि त्यावर क...

घोडावत इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक पालक मेळावा उत्साहात पार पडला

Image
 . घोडावत इन्स्टिट्यूट पॉलिटेक्निकमध्ये शिक्षक–पालक मेळावा उत्साहात पार पडला कोल्हापूर (अतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या पॉलिटेक्निक विभागात आयोजित करण्यात आलेला शिक्षक–पालक मेळावा अत्यंत उत्साही वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षक व पालक यांच्यातील संवाद अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेल्या या मेळाव्यास पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले उपस्थित होते. या वेळी  इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी, पॉलिटेक्निक विभागाचे विभागप्रमुख, कार्यक्रम समन्वयक प्रा. काजल बोहरा हे  उपस्थिती होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागप्रमुख प्रा. सागर चव्हाण यांनी केले. मार्गदर्शन करताना विश्वस्त विनायक भोसले यांनी शिक्षक व पालकांच्या भूमिका आणि जबाबदाऱ्यांवर सखोल प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांनी मुलांना वेळ देणे, योग्य संस्कार करणे आणि त्यांच्या भावनिक गरजा समजून घेणे अत्यंत गरजेचे असल्याच...

“Full Body Safety Harness – Work at Height Protection” या विषयावर संपूर्ण मुद्देसूद व सविस्तर मार्गदर्शन

Image
“Full Body Safety Harness – Work at Height Protection” या विषयावर संपूर्ण मुद्देसूद व सविस्तर मार्गदर्शन  उंचावर काम करताना फुल बॉडी सेफ्टी हार्नेस (Full Body Safety Harness – Work at Height Protection) उंचावर काम करताना अपघात होण्याचा धोका मोठ्या प्रमाणावर असतो. अशा वेळी कामगाराच्या सुरक्षिततेसाठी फुल बॉडी सेफ्टी हार्नेस वापरणे अत्यंत आवश्यक आहे. खाली हार्नेसचे घटक, वापराचे नियम आणि सुरक्षिततेच्या सूचना सविस्तर दिल्या आहेत. 1) फुल बॉडी हार्नेस वापरण्याचे महत्त्व उंचावर काम करताना पूर्ण शरीराला आधार देण्यासाठी फुल बॉडी हार्नेस वापरणे बंधनकारक आहे. पडण्याच्या वेळी शरीरावर होणारा धक्का कमी करून प्राणरक्षण करते. केवळ कंबरपट्टा (waist belt) पुरेसा नसतो. 2) हार्नेसचे मुख्य भाग (Parts of Safety Harness) 2.1 Shoulder Straps (खांद्याचे पट्टे) खांद्यावरून जाणारे पट्टे शरीराचा भार समतोल ठेवतात. हार्नेस योग्य पद्धतीने स्थिर राहण्यास मदत करतात. 2.2 Chest Strap with Buckle (छातीचा पट्टा व बकल) हार्नेस शरीरावर घट्ट बसवण्यासाठी उपयोगी. पडताना हार्नेस सैल होऊ नये यासाठी महत्त्वाचा ...

“Types of Hazards”

“Types of Hazards”   धोके (Hazards) – प्रकार व स्पष्टीकरण धोका (Hazard) म्हणजे काय? कामाच्या ठिकाणी किंवा वातावरणात अशी कोणतीही परिस्थिती, घटक किंवा प्रक्रिया जी अपघात, इजा, आजार किंवा मालमत्तेचे नुकसान करू शकते, तिला धोका (Hazard) असे म्हणतात. 1) भौतिक धोके (Physical Hazards) हे धोके भौतिक घटकांमुळे निर्माण होतात. उदाहरणे : आवाज (Noise): सतत मोठ्या आवाजामुळे ऐकण्याची क्षमता कमी होऊ शकते. कंपन (Vibration): यंत्रांच्या कंपनामुळे स्नायू व सांध्यांचे आजार होऊ शकतात. अतिशय उष्ण किंवा थंड तापमान: उष्माघात किंवा थंडीमुळे आजार होऊ शकतात. अपुरा प्रकाश: डोळ्यांवर ताण येतो व अपघाताची शक्यता वाढते. 2) रासायनिक धोके (Chemical Hazards) रसायनांच्या संपर्कामुळे होणारे धोके. उदाहरणे : धूळ (Dusts) वाफ/धूर (Fumes) वायू (Gases) वाष्पे (Vapours) द्रव रसायने (Liquids & Chemicals) विषारी, संक्षारक व ज्वलनशील पदार्थ परिणाम : त्वचारोग, श्वसनाचे आजार, विषबाधा, आग किंवा स्फोट. 3) जैविक धोके (Biological Hazards) सजीव घटकांमुळे होणारे धोके. उदाहरणे : जिवाणू (Bacteria) विषाणू (Viruses) बुरशी (Fungi) ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये स्पार्क मिंडा कंपनी अंतर्गत ५१ विद्यार्थ्यांची निवड कोल्हापूर (अतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे येथे पुणे येथील नामांकित औद्योगिक समूह “स्पार्क मिंडा” यांच्या वतीने  नुकताच आयोजित करण्यात आलेला कॅम्पस रिक्रूटमेंट ड्राइव्ह अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला. या भरती प्रक्रियेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील ११ इंजिनिअरिंग महाविद्यालय चे एकूण ४१० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ५१ विद्यार्थ्यांची कौशल्य चाचणी व मुलाखती अंतर्गत अंतिम निवड केली.  या कॅम्पस ड्राइव्हमध्ये  संजय घोडावत इन्स्टिट्यूट चे १७ विद्यार्थ्यांची यशस्वी  निवड झाली असून त्यात यांत्रिकी अभियांत्रिकीचे १०, विद्युत अभियांत्रिकीचे ६ आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकीचा १ विद्यार्थी समाविष्ट आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना दि. १५ जून २०२६ रोजी कंपनीत रुजू होण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना २.४ लाख प्रतिवर्ष असे आकर्षक वेतन पॅकेज देण्यात येणार आहे.  या यशस्वी कॅम्पस ड्राइव्हसाठी ट्रेनिंग अँड प्लेसमेंट चे प्रमुख प्रा. आशिष पाटील...

अभिव्यक्ती स्वातंत्र्य

Image

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा परीक्षा निकाल उल्लेखनीय

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी कोर्सचा पावसाळी परीक्षा निकाल उल्लेखनीय कोल्हापूर (आतिग्रे) : संजय घोडावत इन्स्टिट्यूट च्या शॉर्ट टर्म कोर्सेस विभागा अंतर्गत सुरू असलेल्या "ॲडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी" चा शैक्षणिक वर्ष २०२५–२०२६ मधील महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले आहे.  या कोर्समध्ये एकूण पाच विषयांपैकी तीन विषयांचा निकाल १००% टक्के लागला असून विभागातील  केसरकर ऋषिकेश  यांनी ७८.०० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला, चिखले सूरज  यांनी ७७.८० टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक,  पाटील सिद्धेश  यांनी ७७.२० टक्के गुणांसह तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती  विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे यांनी  दिली. आजच्या औद्योगिक युगात सेफ्टी ऑफिसर ही भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. औद्योगिक अपघात टाळणे, कामगारांच्या जीवित व आरोग्याचे संरक्षण करणे, सुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करणे, आपत्कालीन परिस्थित...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या ‘रोहित कळंत्रे याची’ पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी निवड  कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सिव्हिल इंजिनिअरिंग विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असलेला विद्यार्थी रोहित शिवलिंग कळंत्रे याची गुजरात येथे होणाऱ्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी विद्यापीठाच्या संघात निवड झाली आहे. रोहितच्या सातत्यपूर्ण सराव, कठोर मेहनत आणि बहारदार खेळाच्या जोरावर ही निवड झाली आहे. दिनांक ६ ते ११ जानेवारी दरम्यान गुजरात येथे होणाऱ्या या स्पर्धेत तो विद्यापीठ संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, तसेच इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, क्रीडा विभाग  प्रा. विनायक पावटे  यांनी रोहितचे अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर; ६० विद्यार्थ्यांची थेट निवड

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये जॉन डिअरचा कंपनीद्वारे भव्य जॉब फेअर; ६० विद्यार्थ्यांची थेट निवड कोल्हापूर अतिग्रे: संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथे जॉन डिअर प्रायव्हेट लिमिटेड, पुणे या नामांकित कंपनीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या जॉब फेअर निवड प्रक्रियेत इन्स्टिट्यूटमधील डिप्लोमा इंजिनियरिंग, आय.टी.आय. विभागातील एकूण ६० विद्यार्थ्यांची यशस्वी निवड करण्यात आली. या निवड प्रक्रियेसाठी कंपनीचे प्रतिनिधी लवेश सोनी व निखिल काळे हे उपस्थित होते. हा जॉब फेअर कार्यक्रम संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडला.        या मुलाखत प्रक्रियेसाठी इन्स्टिट्यूटच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे प्रमुख आशिष पाटील, आय.टी.आय. विभागाचे  प्राचार्य अविनाश पाटील, प्रा. नितीन पाटील, प्रा. प्रशांत पाटील, प्राध्यपिका  रईसा मुल्ला, इन्स्टिट्यूट अकॅडमिक डीन प्रा. रविंद्र धोंगडी डिपार्टमेंट  समन्वयक सुशांत पाटोळे,  भाग्यश्री भालकर,  प्रथमेश गोंधळी यांच्या टीमने विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना उद्योगजगताशी थेट नोक...

दूरदृष्टीचा शिक्षणयोद्धा : डॉ. विराट वसंतराव गिरी

Image
    डॉ. विराट गिरी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक मनःपूर्वक शुभेच्छा दूरदृष्टीचा शिक्षणयोद्धा : डॉ. विराट वसंतराव गिरी   आजच्या स्पर्धात्मक, तंत्रज्ञानप्रधान आणि झपाट्याने बदलणाऱ्या शिक्षणविश्वात केवळ अभ्यासक्रम पूर्ण करणे पुरेसे ठरत नाही; तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मूल्याधिष्ठित नेतृत्व, दूरदृष्टी आणि संवेदनशील मार्गदर्शनाची नितांत गरज आहे. अशा काळात संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील संचालक डॉ. विराट वसंतराव गिरी हे आधुनिक शिक्षणप्रवाहातील एक प्रेरणादायी नेतृत्व म्हणून ठळकपणे समोर येतात. डॉ. गिरी यांची शैक्षणिक वाटचाल हीच त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देणारी आहे. डीसीओ, बी.ई. (आयटी), एम.टेक (कंप्युटर) आणि व्हीटीयू बेळगावी येथून पीएच.डी. अशी भक्कम शैक्षणिक पार्श्वभूमी लाभलेल्या डॉ. गिरी यांनी शिक्षणाकडे केवळ पदवी किंवा नोकरी मिळवण्याचे साधन म्हणून न पाहता, व्यक्तिमत्त्व घडवण्याची आणि समाज घडवण्याची प्रक्रिया म्हणून पाहिले आहे. आजवर त्यांनी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यक्तिमत्त्व विकास, करिअर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षांतील संधी व आव्हान...