Posts

विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बेडची केली निर्मिती

Image
 संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या चार विद्यार्थ्यांना “राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेत  एक लाख रक्कमेचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस”  विद्यार्थ्यांनी नाविन्यपूर्ण संकल्पनेतून बेडची केली निर्मिती News writer Prof. Ajay B Konge: महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई संचलित, शासकीय तंत्रनिकेतन, मिरज राज्यस्तरीय प्रकल्प स्पर्धेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. त्या स्पर्धेमध्ये संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे श्रीवर्धन अभिजीत पाटील, रसिका अनिल माने, ऋतुजा रवींद्र माने, शाहिद रमजान जमादार या  चार विद्यार्थ्यांना ”कॉस्ट इफेक्टिव्ह इलेक्ट्रिक आयसीयु बेड विथ ड्वेल ऍक्टिव्हेशन“ या पकल्पास प्रथम क्रमांकाचे एक लाख रुपये बक्षीस प्रमाणपत्र आणि सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाचे वैशिष्ट्य सर्व डॉक्टरांना बेडच्या सुविधेमध्ये मोठा फायदा होणार असून या प्रकल्पामध्ये  इलेक्ट्रिक आयसीयु बेड सुविधा उपलब्ध असून हा बेड इतर बेडच्या तुलनेत कमी खर्चात मिळणार आहे. या बेडमध्ये जास्तीच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. हा प्रकल्प तयार करण्यासाठी श्री हॉस्पिटल इक...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “युरेका-२४ तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावर “युरेका-२४ तांत्रिक प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन News Writer Prof. Ajay B Konge  :  संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे बुधवार दिनांक २० मार्च २०२४ रोजी सकाळी १०.०० ते ५.००  या वेळात डिप्लोमा अभियांत्रिकी मधील पदविका अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी “राष्ट्रीय स्तरावरील युरेका-२४ प्रकल्प स्पर्धेचे” आयोजन करण्यात आले आहे. कोणतेही विभागाचे डिप्लोमा अंतिम वर्षाचे विद्यार्थी या प्रकल्प स्पर्धेचे सहभागी होऊ शकतात, या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणतेही नोंदणी शुल्क आकारले जाणार नाही.    https://forms.gle/HiRpPa4VWPUhBwsd9      पॅरामीटर्स तंत्रज्ञानाची निवड, प्रकल्पाचा सामाजिक प्रभाव, इको-फ्रेंडली/उपलब्ध संसाधने आणि साहित्याचा सर्वोत्तम वापर, प्रोटोटाइप/वर्किंग मॉडेल/व्हर्च्युअल मॉडेल/मॉकअप मॉडेल, प्रकल्पाची सौंदर्य आणि पूर्णता, कल्पकता आणि नाविन्यपूर्णता, वापरकर्ता अनुकूल कार्यक्षमता. यातुन  मूल्यांकनाच्या प्रोजेक्ट निवडीसाठी  वापर केला जाणार आहे, विद्यार्थ्यांच...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास” कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
 संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये “तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास”  कार्यक्रम उत्साहात संपन्न नवीन  संकल्प आधारित उद्योजकांना राष्ट्रीय स्तरावर मागणी डॉ. नवीन खंदारे   News Writer Prof. Ajay B Konge  :   जयसिंगपूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या उद्योजकता विकास आणि तंत्रज्ञान व्यवसाय इनक्यूबेटर सेल अंतर्गत ‘तीन दिवसीय राज्यस्तरीय उद्योजकता-स्टार्टअप विकास कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ११ ते १३ मार्च २०२४ रोजी आयोजन करण्यात आले होते. या मार्गदर्शन कार्यशाळेस प्रमुख मार्गदर्शक डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्र विद्यापीठ, लोणेरे, इनोव्हेशन अँड इंक्युबॅशन मुख्य अधिकारी डॉ. नवीन खंदारे, सूक्ष्म व लघु उद्योग मंत्रालय भारत सरकार सी. बी. कोरा खादी ग्रामोद्योग आयोग प्राचार्य, डॉ. सी. बी. सिंथॉल कुमार, उमाकांत डोईफोडे, भारतीय युवाशक्ती ट्रस्टचे कोल्हापूर क्लस्टर हेड विश्वनाथ पवार, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागप्रमुख प्रा.अजय कोंगे, ईडीपी आणि टीबीआय सेल सर्व सदस्य, प्रा. सागर चव्हाण, प्राध्यापिका र...

मराठी भाषा गौरव दिन

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये “मराठी भाषा गौरव दिन” उत्साहात संपन्न प्रा.अजय बी कोंगे :  संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रांगणामध्ये “मराठी भाषा गौरव दिन” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी जयसिंगपूरचे जेष्ठकवी, साहित्यिक वि. दा. आवटी, इचलकरंजीचे प्रसिद्ध कवी प्रा. रोहित शिंगे, संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्राचार्य, डॉ. विराट गिरी, कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन कांबळे, सांस्कृतिक कार्यक्रम समन्वयक, प्रा. सुहास पाटील सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. मातृभाषेचा  गौरव म्हणून व “कुसुमाग्रज” यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस 'मराठी भाषा गौरव दिन' म्हणून साजरा केला जात आहे. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून ‘कुसुमाग्रज’ यांच्या स्मृतीस पुष्प अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. विराट गिरी यांनी केले. मातृभाषेचा उगम, इतिहास, सांगून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये मराठी भाषेचा निर्माण झालेला शब्दकोश यावर मार्गदर्शन करून उपस्थितांना म...

संजयजी घोडावत

Image
 सामान्यातील असामान्य संजयजी घोडावत "सुशीलेच्या सुसंस्कारातून घडला, दानचंदांची दानशूरता शिकला, नीतिमत्तेची नीताभाभीची साथ सोबतीला, मग कोणत्याही पराजयाची भीती संजयजीना कशाला?" संजयजी दानचंदजी घोडावत नावाप्रमाणेच प्रत्येक क्षेत्रात जय म्हणजेच यश प्राप्त करणारे हे व्यक्तिमत्व. यशस्वी, प्रतिभाशाली, तत्वनिष्ठ, दानशूर, उद्योजक, शिक्षणातील दीपस्तंभ, पायलट, अशा अनेक बिरुदावलींनी सुपरिचित असणारे हे व्यक्तिमत्व.  दिडवाना राजस्थान येथील त्यांचे मूळ घराणे असले तरी व्यवसायाच्या निमित्ताने ते महाराष्ट्रात आले आणि कायमचेच मराठी झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील जय‌सिंगपूर येथे दानचंदजी घोडा‌वत व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक झाले. दि २८ फेब्रुवारी १९६५ रोजी सुशीला व दानचंद यांच्या पोटी संजय नावाचे कर्तृत्ववान रत्न जन्मले. एकदम सुसंस्कृत, प्रतिभाशाली अशा जैन समाजात जन्मलेल्या संजयजींना  माता-पित्यांकडून संस्काराचा ठेवा मिळाला. संजयजींचे बालपण जय‌सिंगपूरातच गेले. शालेय शिक्षण जयसिंगपूरमधील जयसिंगपूर हायस्कूलमध्ये झाले. 'स्वप्ने नेहमी मोठी पहावीत. ती स्वप्ने सत्यात उतरवण्याची स्वतःत धमक निर्माण ...

संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव अतिग्रे

 संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवभारत या हिंदीत दैनिकाला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवभारताचे शिल्पकार हा कार्यक्रम घेण्यात आला.नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या भारतातील काही मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.   याप्रसंगी लोकसभा खासदार पूनम महाजन,नवभारत समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक निमिश बाबू माहेश्वरी उपस्थित होते.           घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यापीठाची जबाबदारी विश्वस्त विनायक भोसले यांना दिल्यानंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूट, संजय घोडावत आयआयटी आणि मेडिकल अकॅडमी, संजय घोडावत स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या माध्यमातून क्षणाचा विस्तार सर्व दूर पोहोचवला. यामुळे शिक्षण क्षेत्रात अविरत काम करणारी शिक्षण संस्था म्हणून संजय घोडावत विद्यापीठ नावा रूपाला आले. त्यामुळे राष्ट्रीय राज्य आणि संस्थांतर्गत पातळ...

संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

 संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री. विनायक भोसले यांचा राज्यपालांच्या हस्ते गौरव अतिग्रे: संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले यांना शिक्षण क्षेत्रात अतुलनीय योगदान दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते गौरवण्यात आले. नवभारत या हिंदीत दैनिकाला 90 वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने नवभारताचे शिल्पकार हा कार्यक्रम घेण्यात आला.नवभारताच्या निर्मितीसाठी योगदान देणाऱ्या भारतातील काही मान्यवरांचा यावेळी गौरव करण्यात आला.   याप्रसंगी लोकसभा खासदार पूनम महाजन,नवभारत समूहाच्या व्यवस्थापकीय संचालक निमिश बाबू माहेश्वरी उपस्थित होते.           घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांनी विद्यापीठाची जबाबदारी विश्वस्त विनायक भोसले यांना दिल्यानंतर संजय घोडावत इन्स्टिट्यूट, संजय घोडावत आयआयटी आणि मेडिकल अकॅडमी, संजय घोडावत स्पर्धा परीक्षा केंद्र यांच्या माध्यमातून क्षणाचा विस्तार सर्व दूर पोहोचवला. यामुळे शिक्षण क्षेत्रात अविरत काम करणारी शिक्षण संस्था म्हणून संजय घोडावत विद्यापीठ नावा रूपाला आले. त्यामुळे राष्ट्रीय राज्य आणि संस्थांतर्गत पातळ...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय बी. कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या “मेंटॉर बोर्ड” कमिटीवर निवड.

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे प्रा. अजय बी. कोंगे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाच्या   “ मेंटॉर बोर्ड ” कमिटीवर   निवड.   जयसिंगपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ , लोणेरे , महाराष्ट्र , विद्यापीच्या “ फोरम ऑफ इनोव्हेशन , इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ ” “ मेंटॉर बोर्ड ” कमिटीवर ’ “ मेंटॉर ” म्हणून संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे , विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांची निवड झाली आहे.   डॉ. नविन खंडारे , मुख्य कार्यकारी अधिकारी, फोरम ऑफ इनोव्हेशन , इनक्युबेशन आणि एंटरप्राइझ , बाटू , विद्यापीठ यांनी इमेल पाठून अभिनंदन केले. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त , विनायक भोसले , इन्स्टिट्यूटचे प्राचार्य , डॉ. विराट गिरी यांनी निवड झाल्या बद्दल त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले.    प्रा. अजय कोंगे हे केंद्र आणि राज्य शासनाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता योजनांचे संजय घोडावत शैक्षणिक संकुलनात   २०१६   पासून कार्यरत आहेत.   त्यांनी शासकीय कौशल्य विकास आणि उद्योजकीय योजना ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका: डॉ. विराट गिरी

Image
  संजय घोडावत विद्यापीठ येथे मुख्याध्यापकांचे ६० वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेल उत्साहात संपन्न राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणि मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका:  डॉ. विराट गिरी  जयसिंगपूर :  संजय घोडावत विद्यापीठ, कोल्हापूर येथे दोन दिवसीय निवासी अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त मंडळ पुणे अधिवेशन २०२३  मुख्याध्यापकांचे ६० वे  राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनामध्ये प्रमुख वक्ते मा. डॉ. विराट गिरी प्राचार्य, संजय घोडावत इन्स्टिट्यूट  हे  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण व मुख्याध्यापकांची महत्त्वाची भूमिका या विषयावर मार्गदर्शन करताना बोलत होते. डॉ. गिरी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाचे मुद्दे उपस्थित माध्यमिक मुख्याध्यापकाच्या समोर मांडताना प्रथमता मुख्याध्यापकांची व्याख्या सांगून सुरुवात केली. 'शिक्षकाचे शिक्षक म्हणजे मुख्याध्यापक होय'   ३४ वर्षानंतर आणि २१ व्या शतकातील पहिली शैक्षणिक सुधारणा २०२० मध्ये करण्यात आली. २९ जुलै, २०२० रोजी विद्यमान भारतीय शिक्षण पद्धतीत अनेक बदल घडवून आणण्याच्या उद्देशाने मंत्रिमंडळाने नव...

एम-एस-एम-ई योजना

 केंद्र आणि राज्य शासनाच्या एम-एस-एम-ई उद्योजकांना उद्योग सुलभ होण्याकरिता असलेल्या योजना संदर्भात जागरूकता निर्माण करण्यासाठी एक दिवसीय कार्यशाळा **बुधवार दिनांक २५/१०/२०२३ रोजी राजर्षी शाहू सभागृह, शासकीय विश्रामगृह ,ताराबाई पार्क कोल्हापूर* येथे मा.  जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली आहे.   *सदर कार्यशाळा सकाळी ९.३० ते संध्याकाळी ६.००पर्यंत आहे.*  सदरच्या कार्यशाळेला राज्य आणि केंद्र शासनाचे खालील विभाग संबोधित करणार आहेत. १. मा. उद्योग सहसंचालक पुणे विभाग पुणे. २. राज्य शासनाचे इतर विभाग ३. बँकांच्या एम-एस-एम-ई उद्योजकांसाठी असलेल्या योजना अग्रणी बँक व्यवस्थापक, कोल्हापुर ४. एक्सपोर्ट संदर्भातील अडचणींवर कशी मात करावी त्या संदर्भात एक्सपोटर कडून कथन.  ५.केंद्र शासनाची Zero Effect Zero Defect स्कीम संदर्भात मार्गदर्शन ६. सीडबीच्या उद्योजकांना असलेल्या कर्जाच्या फॅसिलिटी ७. आयडीबीआय कॅपिटल च्या उद्योजकांना असलेल्या कर्जाच्या फॅसिलिटी ८. Importance of Digital Commerce in the MSME Industry.  ९. केंद्र शासनाच्या डीजीएफटी कार्य...