Posts

सैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रम

Image
*सैन्य भरतीसाठी संजय घोडावत फाउंडेशनचा मोफत अन्नछत्र उपक्रम* कोल्हापूर : कोल्हापूर व सातारा जिल्ह्यात होणाऱ्या आगामी सैन्य भरती मोहिमेत देशभरातून सहभाग घेणाऱ्या युवकांसाठी व्हाईट आर्मीतर्फे आयोजित मोफत अन्नछत्राचा संपूर्ण खर्च उचलण्याचा निर्णय संजय घोडावत फाउंडेशनने जाहीर केला आहे. देशसेवेसाठी धडपडणाऱ्या तरुणांना अन्नासारख्या मूलभूत गरजा विनामूल्य उपलब्ध करून देणे ही सामाजिक बांधिलकीच असल्याचे फाउंडेशनने सांगितले.भरती साठी येणाऱ्या २० हजार पेक्षा जास्त सहभागी उमेदवारांना याचा लाभ होणार आहे. संजय घोडावत विद्यापीठात झालेल्या कार्यक्रमात चेअरमन संजय घोडावत यांनी व्हाईट आर्मीचे अध्यक्ष अशोक रोकडे यांना अन्नछत्रासाठीचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी आदी मान्यवर उपस्थित होते. भरती प्रक्रियेदरम्यान हजारो युवक दिवसभर प्रतिक्षेत असल्याने त्यांच्या जेवणाची समस्या  टाळण्यासाठी हा उपक्रम राबवला जात आहे. या वेळी संजय घोडावत फाउंडेशनचे अध्यक्ष संजय घोडावत म्हणाले, “देशाचे रक्षण करणाऱ्या भावी  जवानांसाठी मदत करण्याची संधी आम्ही  आमचे...

“स्वच्छ निवडणूक – सुज्ञ समाजाचा संकल्प”नगरपरिषद निवडणूक 2025 लेखक : प्रा. अजय बी. कोंगे

“स्वच्छ निवडणूक – सुज्ञ समाजाचा संकल्प” नगरपरिषद निवडणूक 2025 विशेष लेखक : प्रा. अजय बी. कोंगे आजच्या लोकशाही व्यवस्थेत निवडणूक म्हणजे केवळ मतदानाचा दिवस नाही; ती समाजाच्या चारित्र्याची, मतदारांच्या सजगतेची आणि उमेदवारांच्या सदसद्विवेकबुद्धीची मोठी परीक्षा आहे. सत्तेच्या राजकारणात अनेकदा अनैतिक मार्गांनी विजय मिळवण्याची प्रवृत्ती वाढताना दिसते, परंतु हीच वेळ समाजहिताच्या दिशेने नवा आदर्श निर्माण करण्याची आहे. नवोदित व अपक्ष उमेदवारांसाठी ही निवडणूक एक स्वच्छ, सुसंस्कृत आणि मूल्याधिष्ठित राजकारणाची मुहूर्तमेढ रोवण्याची सुवर्णसंधी आहे. १) पैशाचे, दारूचे, मटणाचे राजकारण बंद झाले पाहिजे मतांचे लोभसणे म्हणून पैसा, दारू किंवा जेवणाचे ताटे वाटण्याची परंपरा ही लोकशाहीला लागलेली मोठी कीड आहे. उमेदवारांनीच जर ही दूषित पद्धत थांबवली तर मतदारांचेही धाडस वाढेल. पराभव आला तरी चालेल; पण स्वच्छ, आदर्श आणि नैतिक निवडणूक लढवणे हेच खरी राजकीय संस्कृतीचे लक्षण. २) बलाढ्य उमेदवारांचे दोष शोधा… पण अभ्यासपूर्वक! समोरचा उमेदवार बलाढ्य असला तरी त्याचे कमकुवत दुवे, त्याची कार्यशैली आणि त्यातील भ्रष्...

संजय घोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न — माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मूल्याधिष्ठित शिक्षणावर प्रेरणादायी मार्गदर्शन

Image
संजय घोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ उत्साहात संपन्न —  माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे मूल्याधिष्ठित शिक्षणावर प्रेरणादायी मार्गदर्शन "संजय घोडावत विद्यापीठाविषयी गौरवोद्गार माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद" आतिग्रे, कोल्हापूर (१२ नोव्हेंबर) ज्ञान, शिस्त आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची पताका उंचावत संजय घोडावत विद्यापीठाचा सातवा दीक्षांत समारंभ विद्यापीठाच्या भव्य प्रांगणात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या सोहळ्यास भारताचे माजी राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून, तर प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे हे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित होते. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. या समारंभात विविध शाखांतील एकूण ९३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आली. त्यापैकी ९२१ विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर पदवी, तर १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी देण्यात आली. इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, सायन्स, मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड टेक्नॉलॉजी आणि मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी...

संजय घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला

Image
संजय घोडावत विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ १२ नोव्हेंबरला मा.राष्ट्रपती रामनाथजी कोविंद व पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे यांची प्रमुख उपस्थिती आतिग्रे :             संजय घोडावत विद्यापीठाचा ७ वा दीक्षांत समारंभ बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या प्रांगणात पार पडणार आहे.या सोहळ्याला भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथजी कोविंद हे प्रमुख पाहुणे म्हणून  तर  प्रख्यात नेत्रतज्ज्ञ व राज्यसभेचे माजी खासदार,पद्मश्री डॉ. विकासजी महात्मे विशिष्ट अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील.      या दीक्षांत समारंभात विविध शाखांतील एकूण ९३७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये  पदवी व पदव्युत्तर ९२१ तर १६ विद्यार्थ्यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात येणार आहे . यामध्ये इंजिनिअरिंग, फार्मसी, डिझाईन, मीडिया, फिजिकल अँड केमिकल सायन्सेस, कॉमर्स अँड मॅनेजमेंट, आर्ट्स, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजी तसेच मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजी या शाखांचा समावेश आहे. या सोहळ्य...

माहितीचा अधिकार कायदा @2005

माहितीचा अधिकार कायदा @2005 निष्प्रभ झालेला कायदा भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर' घटना समितीने प्रदीर्घ विचारांती भारतात लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्थापन करण्याचा १९५० साली निर्णय घेतला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजा ही राजा. आणि मग शासनात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकच हुद्दा प्रदान करण्यात आला, तो म्हणजे शासकीय सेवक. म्हणजे प्रजारूपी राजाचे सेवक! दुर्दैवाने प्रत्यक्षात मात्र गेल्या ७५ वर्षात शासनात काम करणारे सेवक झाले राजे आणि प्रजासत्ताकातील राजा म्हणवणारी प्रजा झाली सेवक अशी परिस्थिती निर्माण झाली. १९२३ चा ब्रिटिशांनी आणलेला शासकीय गोपनीयता कायदा रद्द झालाच नाही. किंबहुना, त्याचा ब्रिटिशांपेक्षा जास्त प्रभावी वापर करून शासकीय सेवक प्रजारूपी मालकापासून माहिती दडवू लागले. १९७५ पासून सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निकालांमध्ये ‘माहितीचा अधिकार’ हा नागरिकांचा घटनादत्त मूलभूत अधिकार असल्याचे नमूद करत ‘माहिती अधिकार कायदा’ तातडीने तयार करण्याच्या सूचना सरकारला केल्या. अरुणा रॉय यांच्यापासून अण्णा हजारे यांच्यापर्यंत असंख्य सामाजिक कार्यकर...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय यश

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचे  राष्ट्रीय स्पर्धेत उल्लेखनीय  यश "ईअँडटीसी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” ने जिंकले कॅनसॅट चॅलेंजमधील राष्ट्रीय विजेतेपद! कोल्हापूर (प्रतिनिधी): त्रिवेंद्रम (केरळ) येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी (IIST) या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेंशिया २०२५ ही भव्य राष्ट्रीयस्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूटसाठी ऐतिहासिक ठरली आहे. या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टिट्यूट (एसजीआय)* च्या ई अँड टी सी विभागातील “टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स” या विद्यार्थ्यांच्या चमूने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे. या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तेरा नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी), पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी (पीआयसीटी पुणे), एमआयटी-डब्ल्यूपीयू पुणे आणि व्हीआयटी चेन्नई यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा समावेश होता. या कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परिक्षेत एसजीआयचा संघ एकमेव असा ठरला, ज्...

"शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे,"

Image
“शिस्त, शिक्षण आणि समाज – एक नवा विचार” "शाळेत शिक्षकांनी मुलांना फटकारले किंवा मारहाण केली तर पालकांना वाईट वाटू नये. त्यांनी हे समजून घेतले पाहिजे की शाळेत मुलाला मारहाण करणे हे शेवटी पोलिसांकडून मारहाण होण्यापेक्षा चांगले आहे," ✍️ लेखक : प्रा. अजय बी. कोंगे (शिक्षण, मानसशास्त्रीय समुपदेशक) प्रस्तावना “गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः” असे आपले शतकानुशतकांचे तत्त्वज्ञान आहे. गुरू म्हणजेच शिस्त, ज्ञान, मूल्ये आणि संस्कारांचे मूर्तिमंत प्रतीक. परंतु, आजच्या समाजात हीच शिस्त, हेच संस्कार आणि हा आदर हरवत चाललेला दिसतो. शाळेत शिक्षकांनी मुलाला फटकारले किंवा शिस्त लावली तर पालकांच्या मनात लगेच नाराजी उमटते. पण त्याच मुलाने पुढे चुकीचे वर्तन केले तर समाज, पोलिस आणि न्यायव्यवस्था त्याला जाब विचारतात. आजची खरी शोकांतिका अशी आहे की – 👉 शिस्त हरवली, 👉 शिक्षणाचे मूल्य कमी झाले, 👉 पालकांचे नियंत्रण ढासळले, 👉 आणि समाज स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढू लागला. ही परिस्थिती बदलायची असेल तर पालक, शिक्षक, समाज आणि प्रशासन या सर्वांनी आपली भू...

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) माहिती आणि मार्गदर्शक मार्गदर्शक : प्रा. अजय बी. कोंगे प्रस्तावना आजच्या युगात तरुणाई ही समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. रोजगार ही फक्त आर्थिक सुरक्षिततेची बाब नाही, तर आत्मसन्मान, स्वावलंबन आणि सामाजिक प्रतिष्ठा याचाही आधार आहे. पारंपरिक शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांना उद्योजकतेकडे वळविणे ही काळाची गरज आहे. याच गरजेचा वेध घेत महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाच्या भक्कम सहकार्याने, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) राबविला आहे. ही योजना म्हणजे तरुणाईच्या हाताला कौशल्य व संधी मिळवून देणारे सुवर्णद्वार आहे. १ लाख ते ५० लाखांपर्यंत प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान व बँक कर्जाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची दिशा या योजनेतून दिसते. योजनेविषयी थोडेसे हितगुज महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा तर्फे राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा उद्देश फक्त रोजगार निर्माण करणे नाही, तर नवीन उद्योजक तयार करणे आहे. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा नवे उद्योग उभारून इतरांसाठी रोजगार उपलब्ध क...

एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल.

Image
एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल. कोल्हापूर : मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात  अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान मुंबई येथे संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी स्वीकारला.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शशिकांत विश्वकर्मा, आय. बी स्कुल, डेव्हलपमेंट असोसिएट मॅनेजर भारत, श्री. सुरेन रामसुब्बू, संचालक अकॅडमिक इंटरनॅशनल स्टडीस, व अनिल शर्मा फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर एज्युकेशन टुडे हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या शाळांना 'एज्युकेशन टुडे ' या संस्थेमार्फत पुरस्कार देण्यात आले.  महाराष्ट्रातील नंबर वन वन डे कम बोर्डिंग विभागातील स्कूलचा मानाचा किताब संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने मिळवला आहे.  पुरस्काराच्या निमित्ताने विश्वस्त विनायक भोसले यांनी  सं...

कोणत्या ही कामाची चांगली सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन

कामाची चांगली सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन ✍️ लेखक – प्रा. अजय बबनराव कोंगे प्रस्तावना मानवी जीवन म्हणजे कार्यांची अखंड मालिका. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही कामे, जबाबदाऱ्या व संधी घेऊन येतो. कोणत्याही कार्यात यश मिळवायचे असेल, तर त्याची योग्य सुरुवात करणे हे पहिले पाऊल असते. सुरुवातच जर ठोस, नियोजनबद्ध आणि उत्साहवर्धक केली, तर पुढचा संपूर्ण प्रवास सुलभ होतो. मात्र आजच्या धावपळीच्या युगात अनेक जण सुरुवातीच्या टप्प्यातच कारणे शोधतात – वेळ नाही, मनस्थिती योग्य नाही, साधनसामग्री अपुरी आहे, मार्गदर्शन मिळाले नाही, इत्यादी. अशा कारणांमुळे कामाला उशीर होतो, गोंधळ वाढतो आणि अखेरीस यश मिळण्यात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच, "कामाची चांगली सुरुवात" हा विषय केवळ कामकाजापुरता मर्यादित नसून जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू होतो – शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैयक्तिक विकास, कुटुंब व्यवस्थापन किंवा सामाजिक कार्य. या लेखात आपण कामाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची जाणीव ठेवावी, कोणती पद्धत वापरावी, कोणते टप्पे पार पाडावेत आणि त्या मागील मानसशास्त्र काय आहे हे विस्तृतपणे पाहू. १...