प्रा. ए. बी. कोंगे

प्रा. अजय बबनराव कोंगे यांचे शिक्षण - एम. ए. एम. एड. पुणे विद्यापीठ येथे झालेले आसून त्यांनी अध्यापक विद्यालयात प्राध्यापक पदावर 14 वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले आहे. जिल्हा समन्वयक अधिकारी कौशल्य विकास या पदाच्या कामाचा उत्तम अनुभव त्यांना आहे. प्रा. ए. बी. कोंगे हे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास लोकोपयोगी योजनांचे संजय घोडावत विद्यापीठ स्तरावर सेंटर समन्वयक , संजय घोडावत पॉलिटेक्निक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, प्रमुख समन्वयक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना , महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध केंद्र व राज्य सरकारच्या लोकोपयोगी कौशल्य भारत कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण कोर्सेसचे शासकीय योजनातून मोफत विद्यावेतनासह प्रशिक्षण देऊन नोकरी व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान , महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र , दीन दयाळ उपाध्याय...