प्रा. ए. बी. कोंगे
प्रा. अजय
बबनराव कोंगे यांचे शिक्षण - एम. ए. एम. एड. पुणे विद्यापीठ येथे झालेले आसून त्यांनी अध्यापक विद्यालयात प्राध्यापक पदावर 14
वर्ष अध्यापनाचे कार्य केलेले आहे. जिल्हा समन्वयक अधिकारी कौशल्य विकास या पदाच्या कामाचा उत्तम अनुभव त्यांना आहे. प्रा. ए. बी. कोंगे हे केंद्र व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास
लोकोपयोगी योजनांचे संजय घोडावत विद्यापीठ स्तरावर सेंटर समन्वयक, संजय
घोडावत पॉलिटेक्निक कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, प्रमुख समन्वयक म्हणून
कार्यरत आहेत. त्यांनी सुशिक्षित बेरोजगार
युवक-युवतींना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध केंद्र व राज्य
सरकारच्या लोकोपयोगी कौशल्य भारत कौशल्य विकास आणि उद्योजकता प्रशिक्षण कोर्सेसचे शासकीय योजनातून मोफत विद्यावेतनासह प्रशिक्षण देऊन नोकरी व्यवसायाची
संधी उपलब्ध करून दिली आहे. विवध वर्तमानपत्रांनी त्यांचे लेख प्रशिद्ध
केलेले आहेत. शैक्षणिक, सामाजिक
आणि शासकीय क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रा. कोंगे यांना महाराष्ट्र शासन, माहिती व जनसंपर्क महासंचालनालय “सोशल मीडिया
महामित्र” सन्मानपत्र देवून या विधायक
कार्याबद्दल गौरव करण्यात आला असून विजया लक्ष्मी सोशल फौंडेशन आणि शिंगाडे
चॅरिटेबल ट्रस्ट, बेळगाव यांच्याकडून “राष्ट्रीय आदर्श शिक्षकरत्न गौरव” तसेच
मुंबई गुणिजन गौरव महापरिषद पुरस्कार 2021 अंतर्गत "राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न
पुरस्कार 2021" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.