संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये “कौशल्य विकास आणि शासकीय योजना, प्रशिक्षण कार्यक्रम” मार्गदर्शन व परिचय मेळावा. जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विविध मार्गदर्शन कार्यक्रम संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्ग आयोजित शासकीय योजनातील प्रशिक्षण, कोर्सेस, कार्यशाळा, माहिती, जाणीवजागृती, मार्गदर्शन कार्यक्रम ( सप्ताह ) दिनांक २५/०७/२०२२ ते ३०/०७/२०२२ या कालावधी मध्ये प्रशिक्षणा बाबत माहिती , मार्गदर्शन व प्रवेश अर्ज स्विकारण्यासाठी ६ दिवशीय परिचय कार्यक्रम संजय घोडावत युनिव्हर्सिटी कॅम्पस कोल्हापूर सांगली हायवे अतिग्रे ४१६११८ जिल्हा कोल्हापूर. येथे आयोजित करण्यात आला आहे. सदर कार्यक्रमास उपस्थित व इच्छुकांना विविध तांत्रिक अभ्यासक्रम सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटर, फौंड्री टेक्नॉलॉजी, वेल्डिंग असिस्टंट, ऑटोकॅड डिझायनर, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, सोलार टीव्ही इन्स्टॉलर, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, जीएसटी अकाउंट असिस्टंट. यासह सॉफ्ट स्किल्स व्यक्तिमत्त्व विकास , उ...