Posts

Counselor

Image
  समुपदेशन म्हणजे काय   ? अमेरिकन कौन्सिलिंग असोसिएशन एक्सटर्नल लिंक:ओपन _ इन _ न्यू (एसीए) नुसार , व्यावसायिक समुपदेशन ही व्यक्तींशी संबंध निर्माण करण्याची प्रक्रिया आहे जी त्यांना मानसिक आरोग्य आणि निरोगीपणा , शिक्षण आणि करिअरची उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी सक्षम करते. हे समुपदेशक आणि त्यांचे ग्राहक यांच्यातील सहयोगी संबंध आहे. व्यावसायिक समुपदेशन खालीलप्रमाणे असू शकते: वैयक्तिक समुपदेशन हा समुपदेशनाचा सर्वात सामान्य प्रकार आहे जो एखाद्या व्यक्तीच्या वाढीवर आणि मानसिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करतो. जोडपे किंवा विवाह समुपदेशन जोडप्यांना संघर्षावर मात करण्यासाठी आणि मजबूत नातेसंबंधासाठी कार्य करण्यास मदत करण्यावर लक्ष केंद्रित करते. कौटुंबिक समुपदेशनामध्ये भिन्न कौटुंबिक गतिशीलता आणि त्यांचा कौटुंबिक रचनेवर कसा परिणाम होतो याचा समावेश असतो. गट समुपदेशन म्हणजे गट संवादाचा वापर वाढीस सुलभ करण्यासाठी.   समुपदेशन म्हणजे काय ? तुम्ही करिअर म्हणून समुपदेशनाचा विचार करत असल्यास , समुपदेशकाच्या भूमिका , अपेक्षा आणि जबाबदाऱ्या समजून घेणे महत्त्वाचे आहे. अमेरिकन समुपदेशन असोसिएश...

अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब

Image
अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला महाराष्ट्रातील नंबर वन स्कूलचा किताब कोल्हापूर : अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल ने महाराष्ट्रातील शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करत 'एज्युकेशन वर्ल्ड' संस्थेमार्फत महाराष्ट्रातील व कोल्हापूर जिल्ह्यातील डे कम बोर्डिंग विभागातील नंबर वन स्कूलचा किताब मिळवला आहे. दिल्ली-गुडगाव येथे झालेल्या शैक्षणिक पुरस्कार वितरण सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुरस्काराच्या निमित्ताने त्यांनी संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका प्राचार्या श्रीमती सस्मिता मोहंती यांच्या नेतृत्वाखालील उत्कृष्ट कार्याची प्रशंसा केली. त्यांनी म्हटले की, "प्राचार्या मोहंती यांच्या कुशल व्यवस्थापनामुळेच शाळेला हा गौरव मिळाला आहे." या प्रसंगी बोलताना श्रीमती सस्मिता मोहंती म्हणाल्या, "विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण देण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नामुळेच हा पुरस्कार मिळाला आहे. अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा, नवोपक्रम, उ...

संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार

Image
संजय घोडावत यांना एज्युकेशन आयकॉन पुरस्कार अतिग्रे : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल संजय घोडावत यांना एज्युकेशन टुडे संस्थेच्या वतीने यावर्षीचा एज्युकेशन आयकॉन पुरस्कार मुंबई येथे सुप्रसिद्ध मनोविकार तज्ञ कन्नन गिरीश यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक अनिल शर्मा उपस्थित होते.          घोडावत यांनी पश्चिम महाराष्ट्र व बेळगाव येथे शैक्षणिक संकुलाची निर्मिती केली आहे. केजी टू पीएचडी पर्यंतचे शिक्षण इथे घेता येते.येथील विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. उत्कृष्ट प्रॅक्टिकल लॅब, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, फूड कोर्ट अशा पायाभूत सुविधा विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्या. आहेत. संजय घोडावत विद्यापीठातील विद्यार्थी जागतिक स्तरावर विविध कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. त्यांना गुणवत्तापूर्ण आणि कौशल्यपूर्ण शिक्षण विद्यापीठाच्या पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाद्वारे दिले जाते.तसेच विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती वाढावी व कौशल्य वाढीस लागावे यासाठी विविध कोर्सेस व वैश...

पंकजाताई गोपिनाथ मुंढे दसरा मेळावा २०२४

Image
ऐश्वर्यसंपन्न राष्ट्रसंत श्री भगवान बाबा यांची जन्मभूमी, भगवान भक्तीगड, सावरगाव घाट येथे दरवर्षीच्या परंपरेनुसार ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. यंदाही मेळाव्यास विराट जनसगर उसळला होता. या जनसमुदायासमोर नतमस्तक होऊन उपस्थितांना अभिवादन केले. तत्पूर्वी संत श्री. भगवान बाबांची विधिवत पूजा आणि आरती करून बाबांच्या चरणी नतमस्तक झाले. मी दरवर्षी दसरा मेळाव्याला आपल्या सर्वांना साष्टांग नमस्कार घालते. कारण मुंडे साहेबांनी तुमची जबाबदारी माझ्या झोळीत टाकली आहे. मी विजयी झाल्यावर तुम्ही सर्वांनी मला मोठा मान दिला. परंतु पराभव झाल्यानंतर तुम्ही लोकांनी त्यापेक्षा अधिक सन्मान मला दिला आहे. आता तुम्हा सर्वांना मान देण्यासाठी गावागावात आणि महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यात दौरा करणार आहे. या मंचावर अठरा पगड जातींचे आणि समोर सर्व धर्माचे लोक आले आहेत. संत भगवान बाबांनी ज्या कारणासाठी गड उभारला ते कारण विसरून कधीही राजकारण करणार नाही. मी आजपर्यंत कधी जातीपातीच राजकारण केले नाही. डाग पडू नये याची काळजी घेत सत्व आणि तत्व जपूनच माझं राजकारण राहील असा विश्वास याप्रसंगी उपस्थितांना दिला. ...

माहितीचा अधिकार कायदा 2005

Image
आज १२ ऑक्टोबर, माहिती अधिकार कायदा अस्तित्वात आला त्याला १७ वर्षे पूर्ण होत आहेत, त्या निमित्ताने "सकाळ" मधे प्रसिद्ध झालेला Vivek Velankar सरांचा लेख. माहिती अधिकार कायद्याच्या अस्त्राला ग्रहण  भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर' घटना समितीने प्रदीर्घ विचारांती भारतात लोकशाही प्रजासत्ताक राजवट स्थापन करण्याचा १९५० साली  निर्णय घेतला. प्रजासत्ताक म्हणजे प्रजेची सत्ता. प्रजा ही राजा. आणि मग शासनात काम करणाऱ्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना एकच हुद्दा प्रदान करण्यात आला, तो म्हणजे शासकीय सेवक. म्हणजे प्रजारूपी राजाचे सेवक! दुर्दैवाने प्रत्यक्षात मात्र गेल्या ७५ वर्षात  शासनात काम करणारे सेवक झाले राजे आणि प्रजासत्ताकातील राजा म्हणवणारी प्रजा झाली सेवक अशी परिस्थिती निर्माण झाली. १९२३ चा ब्रिटिशांनी आणलेला शासकीय गोपनीयता कायदा रद्द झालाच नाही. किंबहुना, त्याचा ब्रिटिशांपेक्षा जास्त प्रभावी वापर करून शासकीय सेवक प्रजारूपी मालकापासून माहिती दडवू लागले. १९७५ पासून सर्वोच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निकालांमध्ये ‘माहितीचा अधिकार’ हा नागरिकांचा घटनादत्त मू...

महाराष्ट्र शासन शिष्यवृत्ती योजना माहिती आणि मार्गदर्शन

Image

महाराष्ट्र शासन कौशल्य विकास योजना माहिती आणि मार्गदर्शन

Image