करिअर मार्गदर्शन
करियर मार्गदर्शन कार्यक्रम 2022-23
10 वी 12 नंतर काय सर्वच परीक्षा देलेल्या विद्यार्थांना पडलेला प्रश्नाचे अचूक उत्तर विद्यार्थांना शोधून देण्यासाठी आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रम चिराग कॉम्प्युटर्स वडणगे येथे MSCIT प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांनासाठी संजय घोडावत पॉलीटेक्निक, अतिग्रे येथे आज करीअर मार्गदर्शन मेळावा पर्व १८ वे आयोजित करण्यात आले होते. या करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात करीअर समुपदेशक कॉलेजचे प्राचार्य, प्रा. विराट गिरी यांचे मार्गदर्शन लाभले, करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात 300+ पेक्षा जास्त इ. 10 वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास पाटील यांनी केले, करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून यशस्वीरीत्या पार पाडणेसाठी संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन कॉलेजचे प्रवेश समन्वयक प्रा. नितीन जाधव यांच्या सोबत सर्व टिचिंग व नॉन टिचिंग स्टाफ यांचे सहकार्य मिळाले. आपणाकडून मिळालेल्या सहकार्यबद्दल सर्वांचे मनपुर्वक आभार