आज दि ०९ जून २०२२ ,रोजी उद्योजकता विकास परिचय मेळावा(२) संजय घोडावत पॉलिटेक्निकल कॉलेज अतिग्रे ता .हातकणंगले जि. कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाला सदरच्या उद्योजकता विकास परिचय मेळावा साठी प्रमुख मान्यवर अग्रणी बँकेचे मॅनेजर मा.गणेश यादव तसेच संजय घोडावत पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विराज गिरी व एम सी डी चे प्रकल्प अधिकारी मा.प्रवीण कायंदे तसेच बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख प्रा.अजय कोंगे उपस्थित होते.

सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले उद्योजकता विकास परिचय मेळाव्याचे मार्गदर्शन एम सी डी चे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे यांनी केले बँकांविषयी व सी एम जी पी योजनांविषयी माहिती अग्रणी बँकेचे गणेश यादव यांनी केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना संजय घोडावत कॉलेज चे प्राचार्य डॉ. विराज गिरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित युवकांच्या समस्यांचे निरासरण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सुनंदा मेटकर यांनी केले तर आभार संजय घोडावत कॉलेजचे प्रा.अजय कोंगे यांनी मानले. सदरचा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी बार्टीचे समतादूत सुनंदा मेटकर, पूजा धोतरे, किरण चौगुले, आशा रावण, तेजस्विनी कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात युवक-युवतींनी सहभाग नोंदवला.


 **आजची एकूण उपस्थिती :- ९५*




Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)