धन्यवाद
प्रिय सर्व सहकारी शिक्षक व शिक्षिका,
डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस,
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, कोल्हापूर.
आदरणीय संचालक डॉ. विराट गिरी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये शैक्षणिक कामकाजात आपापली जबाबदारी समर्थपणे पार पाडत विद्यार्थ्यांना कुशल व पारंगत घडवण्यासाठी आपण सर्वांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे आहे.
आज दिनांक २८ एप्रिल २५ रोजी आपल्या प्रॅक्टिकल परीक्षा यशस्वीरित्या पार पडल्या असून, विद्यार्थ्यांच्या यशामध्ये प्रत्येकाचे परिश्रम व सहकार्य मोलाचे ठरले आहे.
आपल्या सर्वांच्या अथक परिश्रम, सकारात्मक सहभाग आणि सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व धन्यवाद व्यक्त करतो.
पुढील वाटचालीसाठी आपण असेच एकत्रितपणे कार्य करत राहू, हीच अपेक्षा!
शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये डिप्लोमा इन ड्रेस डिझाईनिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग (डीएम) हा कोर्स बंद करण्यात आला आहे. डिप्लोमा इन फोटोग्राफी अँड व्हिडिओ ग्राफी (पीव्ही) 50% ऍडमिशन झाले तर हा कोर्स चालू ठेवण्यात येईल, प्रवेश होण्यासाठी आपण सहकार्य करावे ही अपेक्षा, ऍडव्हान्स डिप्लोमा इन इंडस्ट्रियल सेफ्टी (आयटी) या कोर्सचे 40 पैकी 40 प्रवेश पूर्ण झाले असून 22 प्रवेश वेटिंग लिस्ट मध्ये समाविष्ट आहेत.
आपल्या सर्वांच्या सहकार्याबद्दल मनापासून धन्यवाद.
धन्यवाद व शुभेच्छा!
आपला.
प्रा. अजय बी. कोंगे,
M.A. M.Ed.(Education)
विभाग प्रमुख,
डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट टर्म कोर्सेस, संजय घोडावत इन्स्टिट्यूट अतिग्रे जिल्हा कोल्हापूर.