सकाळ आणि घोडावत विद्यापीठांतर्गत 'समर युथ समिट' ३ व ४ जून रोजी कोल्हापुरात


सकाळ आणि  घोडावत विद्यापीठांतर्गत
 'समर युथ समिट' ३ व ४ जून रोजी कोल्हापुरात

कोल्हापूर : विद्यार्थ्यांच्या करिअर घडवणाऱ्या आणि पालकांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘समर युथ समिट’ या विशेष उपक्रमाचे आयोजन दिनांक ३ आणि ४ जून २०२५ रोजी राजर्षी शाहू सभागृह, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे करण्यात आले आहे.

या उपक्रमाचे उद्घाटन ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता मा. विनायक भोसले, विश्वस्त – संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.

दैनिक ‘सकाळ’ यिनतर्फे आयोजित या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील तज्ज्ञ, मार्गदर्शक, उद्योजक आणि युवा नेते सहभागी होणार आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांना करिअर निवड, उद्योग क्षेत्रातील संधी, नवउद्योजकता, डिजिटल युगातील कौशल्ये यांसारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन मिळणार आहे.

हा उपक्रम महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी चुकवू नये असा असून, भविष्यातील दिशा ठरवण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची संधी आहे.

अधिक माहितीसाठी संजय घोडावत विद्यापीठ, अतिग्रे, कोल्हापूर येथे संपर्क साधावा. असे आव्हान ऍडमिशन विभागांतर्गत करण्यात आले आहे. 

'समर युथ समिट' या कार्यक्रमास संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)