संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न


संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये  वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

कोल्हापूर – संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून संस्थेच्या परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विभागांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

या प्रसंगी अकॅडमी डीन  प्रा. रवींद्र धोंगडी, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, कॉम्प्युटर विभाग प्रमुख प्रा. सागर चव्हाण, इलेक्ट्रिकल विभाग प्रमुख प्रा. नितीन पाटील, इलेक्ट्रॉनिक्स विभाग प्रमुख प्रा. रईसा मुल्ला, प्रा. शुभांगी महाडिक, डिग्री मेकॅनिकल विभाग प्रमुख प्रा. स्वप्निल थिकने, प्रा. सोहम तिवडे, गार्डन विभागाचे  तात्या देसाई व त्यांच्या टीमसह डिग्री इंजिनिअरिंग विभागाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते.

या वेळी बोलताना डॉ. गिरी  म्हणाले, “वृक्षारोपण ही आजच्या काळाची गरज असून केवळ झाडे लावणेच नव्हे तर त्यांचे जतन व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये ग्रीन कॅम्पस ठेवण्यावर नेहमीच भर दिला जातो. त्यामुळे पर्यावरण पूरक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांमध्ये नैतिक आणि सामाजिक जाणीवा निर्माण केल्या जातात.”

कार्यक्रमाचे आयोजन प्रा. अजय कोंगे यांनी यशस्वीपणे पार पडले असून उपस्थित सर्वांनी एक झाड लावून त्याचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली.

"वृक्षारोपण कार्यक्रमास" संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी शुभेच्छा दिल्या.


Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)