संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवी


संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या प्रा. स्वप्निल ठिकणे यांना डॉक्टरेट पदवी

कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे येथील मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागाचे विभागप्रमुख प्रा. स्वप्निल जिनेंद्र ठिकणे यांना विश्वेश्वरैया टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी, बेळगावी  या नामवंत विद्यापीठाकडून मेकॅनिकल इंजिनियरिंग विभागात डॉक्टरेट  पदवी प्रदान करण्यात आली आहे.

प्रा. ठिकणे यांनी "थर्मल परफॉर्मन्स इनहान्समेंट ऑफ रेक्टअँग्युलर डक्ट रफनड विथ डिफरेंट अरेंजमेंटस ऑफ कन्टिन्यूअस अँड ट्रंकेटेड सेमी सर्क्युलर रिब टर्ब्युलेटर्स" या अत्यंत तांत्रिक व उद्योगक्षेत्रासाठी उपयुक्त अशा विषयावर सखोल संशोधन केले. त्यांच्या या संशोधनासाठी मराठा मंडळ इंजिनिअरिंग कॉलेज, बेळगावी येथील प्रा. डॉ. सुरेश माश्याळ यांचे मार्गदर्शन लाभले.

प्रा. ठिकणे यांच्या यशामध्ये संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी यांचे वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन आणि सहकार्य मोलाचे ठरले. त्यांच्या यशामुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रातील प्रतिष्ठेला अधिक बळकटी मिळाली आहे.

या उल्लेखनीय यशाबद्दल प्रा. ठिकणे यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत असून, संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी यांनी शुभेच्छा देऊन त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)