Posts

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP)

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) माहिती आणि मार्गदर्शक मार्गदर्शक : प्रा. अजय बी. कोंगे प्रस्तावना आजच्या युगात तरुणाई ही समाजाच्या प्रगतीची खरी ताकद आहे. रोजगार ही फक्त आर्थिक सुरक्षिततेची बाब नाही, तर आत्मसन्मान, स्वावलंबन आणि सामाजिक प्रतिष्ठा याचाही आधार आहे. पारंपरिक शिक्षण पूर्ण करून नोकरीच्या शोधात फिरणाऱ्या तरुणांना उद्योजकतेकडे वळविणे ही काळाची गरज आहे. याच गरजेचा वेध घेत महाराष्ट्र शासनाने, केंद्र शासनाच्या भक्कम सहकार्याने, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) राबविला आहे. ही योजना म्हणजे तरुणाईच्या हाताला कौशल्य व संधी मिळवून देणारे सुवर्णद्वार आहे. १ लाख ते ५० लाखांपर्यंत प्रकल्प राबविण्यासाठी प्रोत्साहनपर अनुदान व बँक कर्जाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताची दिशा या योजनेतून दिसते. योजनेविषयी थोडेसे हितगुज महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळा तर्फे राबविल्या जाणाऱ्या या योजनेचा उद्देश फक्त रोजगार निर्माण करणे नाही, तर नवीन उद्योजक तयार करणे आहे. नोकरीच्या मागे धावण्यापेक्षा नवे उद्योग उभारून इतरांसाठी रोजगार उपलब्ध क...

एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल.

Image
एज्युकेशन टुडेच्या अहवालानुसार संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल महाराष्ट्रातील नंबर वन स्कूल. कोल्हापूर : मुंबई येथील हॉटेल ललित या पंचतारांकित हॉटेलमध्ये नुकत्याच पार पडलेल्या शैक्षणिक कार्यक्रमात  अतिग्रे येथील संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलला डे कम बोर्डिंग विभागात महाराष्ट्रातील प्रथम क्रमांकाचा सन्मान प्राप्त झाला. हा सन्मान मुंबई येथे संजय घोडावत शिक्षण संकुलाचे विश्वस्त श्री विनायक भोसले यांनी स्वीकारला.  यावेळी प्रमुख अतिथी म्हणून श्री शशिकांत विश्वकर्मा, आय. बी स्कुल, डेव्हलपमेंट असोसिएट मॅनेजर भारत, श्री. सुरेन रामसुब्बू, संचालक अकॅडमिक इंटरनॅशनल स्टडीस, व अनिल शर्मा फाउंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर एज्युकेशन टुडे हे उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते हा सन्मान स्वीकारला. शिक्षण क्षेत्रात अभिमानास्पद कामगिरी करणाऱ्या शाळांना 'एज्युकेशन टुडे ' या संस्थेमार्फत पुरस्कार देण्यात आले.  महाराष्ट्रातील नंबर वन वन डे कम बोर्डिंग विभागातील स्कूलचा मानाचा किताब संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलने मिळवला आहे.  पुरस्काराच्या निमित्ताने विश्वस्त विनायक भोसले यांनी  सं...

कोणत्या ही कामाची चांगली सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन

कामाची चांगली सुरुवात करण्यासाठी मार्गदर्शन ✍️ लेखक – प्रा. अजय बबनराव कोंगे प्रस्तावना मानवी जीवन म्हणजे कार्यांची अखंड मालिका. प्रत्येक दिवस आपल्याला काही ना काही कामे, जबाबदाऱ्या व संधी घेऊन येतो. कोणत्याही कार्यात यश मिळवायचे असेल, तर त्याची योग्य सुरुवात करणे हे पहिले पाऊल असते. सुरुवातच जर ठोस, नियोजनबद्ध आणि उत्साहवर्धक केली, तर पुढचा संपूर्ण प्रवास सुलभ होतो. मात्र आजच्या धावपळीच्या युगात अनेक जण सुरुवातीच्या टप्प्यातच कारणे शोधतात – वेळ नाही, मनस्थिती योग्य नाही, साधनसामग्री अपुरी आहे, मार्गदर्शन मिळाले नाही, इत्यादी. अशा कारणांमुळे कामाला उशीर होतो, गोंधळ वाढतो आणि अखेरीस यश मिळण्यात अडथळे निर्माण होतात. म्हणूनच, "कामाची चांगली सुरुवात" हा विषय केवळ कामकाजापुरता मर्यादित नसून जीवनातील प्रत्येक क्षेत्राला लागू होतो – शिक्षण, नोकरी, व्यवसाय, वैयक्तिक विकास, कुटुंब व्यवस्थापन किंवा सामाजिक कार्य. या लेखात आपण कामाची सुरुवात करताना कोणत्या गोष्टींची जाणीव ठेवावी, कोणती पद्धत वापरावी, कोणते टप्पे पार पाडावेत आणि त्या मागील मानसशास्त्र काय आहे हे विस्तृतपणे पाहू. १...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट  अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी, आयटीआय, शॉर्ट टर्म. सर्व विभागास विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न. कोल्हापूर : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये डिप्लोमा, डिग्री, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेस या सर्व विभागांच्या प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पदवी अभियांत्रिकी व शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५ प्रेरणा कार्यक्रम” संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त,  विनायक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पालक प्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष पदवी विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी महाडिक, शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, सर्व विभागाचे  विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्य...

संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात "सामंजस्य करार" संपन्न

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात  "सामंजस्य करार" संपन्न कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, आणि इंपेलेक्स एम्पायर यांच्यात बौद्धिक संपदा अधिकार (आयपीआर) विषयक सामंजस्य करार  आज यशस्वीरित्या संपन्न झाला. या करारानिमित्त आयोजित तज्ञांनी सत्रात विद्यार्थ्यांना व शिक्षकांना नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याचे आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे आवाहन करण्यात आले. डॉ. मोहिनी सूर्यवंशी यांनी 'नवीन कल्पनेत नाविन्य आहे की नाही, हे कसे ओळखावे' याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्यांनी नवकल्पनांचे मूल्यमापन, संरक्षणाच्या पद्धतींवर तपशीलवार मार्गदर्शन केले.   या प्रसंगी इन्स्टिट्यूट चे संचालक डॉ. विराट गिरी यांनी बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, “आयपीआर" मुळे नाविन्यपूर्ण कल्पनांना संरक्षण मिळते. संशोधन, प्रकल्प व स्टार्टअप संस्कृतीला यामुळे चालना मिळते.” या करारामुळे संस्थेतील विद्यार्थी आणि शिक्षकांना नाविन्यपूर्ण संशोधन, प्रकल्प विकास व बौद्धिक संपदा अधिकार विषयक मार्गदर्शन मिळणार असून उद्योग-शिक्षण...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटतर्फे “एआय आधारित ATAL Online फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम” कार्यक्रमाचे आयोजन  कोल्हापूर, अतिग्रे : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे (कोल्हापूर) येथे एआयसीटीई व डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनियरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने   "शिक्षण आणि संशोधनात एआय वापरून शिक्षकांना सक्षम बनवणे"   या विषयावर आधारित   सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रॅम   आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम   १ ते ६ सप्टेंबर २०२५   या कालावधीत आयोजन केले आहे. या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक, प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स    विषयक आधुनिक तंत्रज्ञान, अध्यापन व संशोधनातील वापर, तसेच जबाबदार आणि नैतिक दृष्टिकोनातून एआयच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे. कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय शिक्षणात एआयची ओळख,  स्मार्ट टीचिंगसाठी एआय टूल्स, वैयक्तिक व सर्वसमावेशक शिक्षणासाठी एआय,  संशोधनातील एआयचा वापर,  नैतिकता, पक्षपात...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन न्यूज 18 लोकमतचे वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे यांची प्रमुख उपस्थिती.

Image
  संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन नाविन्यपूर्ण कार्यक्रमांनी संपण  न्यूज18 लोकमतचे वरिष्ठ वृत्तनिवेदक विलास बडे यांची प्रमुख उपस्थिती  चौकटीत : पश्चिम महाराष्ट्रातील उत्तम शिक्षण देणारी शैक्षणिक संस्था  "संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे कोल्हापूर" असे गौरवोद्गार विलास बडे यांनी काढले कोल्हापूर  – संजय घोडावत इन्स्टिट्यूटचा १३वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांच्या आयोजनातून उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख मान्यवरांच्या हस्ते इन्स्टिट्यूटच्या ग्रीन  कॅम्पस मध्ये वृक्षारोपण व दीपप्रज्वलनाने झाली. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून न्यूज18 लोकमतचे सीनियर वरिष्ठ वृत्तनिवेदक  विलास बडे, सिंजेंटा इंडिया प्रा.लि. संचालक डॉ. माधवानंद काशीद, कंट्री लीड प्रा.लि चे संचालक श्रीधर लाढाणे, संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी, कार्यक्रम समन्वयक प्रा. एम एस काळे, प्रा. सौ. एन एस सासणे सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकात दिवस उत्सवात साजरा.

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय उद्योजकात दिवस उत्सवात साजरा.  कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या  उद्योजकता विकास  आणि तंत्रज्ञान व्यवसाय इंकुबेटर  सेल अंतर्गत राष्ट्रीय उद्योजकता दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उद्योगजगतामध्ये नावाजलेले उद्योजक "अमर जाधव" मॅनेजिंग डायरेक्टर आकुरा टेक ग्रुप हे उपस्थित होते. आपल्या प्रभावी मार्गदर्शनात ते म्हणाले, “उद्योजक होण्यासाठी फक्त स्वप्ने पाहून चालत नाही, तर प्रत्यक्षात रिस्क घेऊन कृती करावी लागते. उद्योग करणे म्हणजे केवळ नफा कमावणे नसून समाजसेवा करण्यासारखेच आहे. उद्योजकतेसाठी रात्रंदिवस परिश्रम करावे लागतात. ‘सिक्रेट’ सारखी प्रेरणादायी पुस्तके वाचून दृष्टीकोन बदलावा आणि नेहमी मोठे व्हिजन निवडावे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संचालक डॉ. विराट गिरी यांनी केले. त्यांनी जागतिक उद्योजकता दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. यावेळी प्रथम वर्ष विभाग प्रमुख प्रा. प्रशांत पाटील तसेच डिग्री इंजिनिअरिंगचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयो...

संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३ वा वर्धापन दिनानिमित्त “निंबस २ के २५” विविध नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन

Image
संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या १३ वा वर्धापन दिनानिमित्त  “निंबस २ के २५” विविध नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन कोल्हापूर : संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे १३ वा वर्धापन दिनानिमितत्ताने “निंबस २ के २५” या राष्ट्रीय स्तरावरील भव्य स्पर्धेद्वारे २३ ऑगस्ट २०२५ रोजी उत्साहात साजरा होणार आहे. या कार्यक्रमात नवोन्मेष, प्रेरणा आणि उत्सव यांचा सुंदर संगम पहायला मिळणार आहे. नाविन्यपूर्ण राष्ट्रीय स्पर्धेमध्ये कॅड बस्टर, पोस्टर प्रेसेंटेशन, सर्किट्रिक्स हँक हंट, मेलोडी मस्ती, तसेच कौन बनेगा सवालों का सरताज अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून देशभरातील विद्यार्थी यात सहभागी होणार आहेत. विजेत्यांसाठी रु. १,००,००० पर्यंतची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्यास प्रमाणपत्र दिले जाणार आहे. यावेळी रक्तदान शिबिर व पुस्तक दान उपक्रम या सामाजिक जबाबदारीशी निगडित कार्यक्रमांचाही समावेश केलेला असून, विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक भान निर्माण करण्याचा इन्स्टिट्यूटचा मुख्य हेतू आहे. हा कार्यक्रम संजय घोडावत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ. विराट गिरी यांच्या मार्गदर्शना...

प.पू. वेदांता चार्य योगमहर्षी बालब्रह्मचारी गुरुदेव श्री संत नारायण महाराज (बाबा) ,श्री क्षेत्र तारकेश्र्वर गड ..

Image
प.पू. वेदांता चा र्य  योगमहर्षी बालब्रह्मचारी गुरुदेव श्री संत नारायण महाराज (बाबा) ,श्री क्षेत्र तारकेश्र्वर गड ..महिंदा ता .आष्टी जिल्हा बीड परंतु पाथर्डी  जिल्हा अहील्यानगर जवळ आहे .वावर नगर जिल्ह्यात जास्त होता आजही आहे. महाराज हे जन्मले ते मुळात जन्म झाल्यावर एकदम थोडे मोठे झाले आणि आईला स्वतः.चे अवतार कार्य सांगितले.ते एका पाटील घराण्यात जन्माला आले होते. व आईच्या सांगण्यावरून परत ते बालक झाले . शालेय शिक्षण गावी झाले  घरात मन रमले नाही. वडिलांनी त्यांना किराणा दुकान टाकून दिली खूप लहान वयात पण लोकांना सामान द्यायचे पैसे मागत नव्हते त्यामुळं दुकान तोट्यात गेली.लोकांनी प्रामाणिक पने पैसे दिले नाही आणि ह्यांनी मागितले नाही. पुढे ते घरदार सोडून आळंदीला गेले काही दिवस राहिले पण तिथेही मन फार काळ रमले नाही मग पंढरपूर येथे गेले.तिथे थोडे दिवस राहिले ईश्वर आज्ञा झाली आणि काशीला गेले.तेथे विश्व विद्यालय मध्ये त्यांना प्रवेश मिळाला.जन्मजात प्रचंड बुद्धिमान व लहान वयात ही चमत्कारच दिसत होते. 12 वर्ष वेद अध्ययन केले. पुढे ऋषकेस जवळील जंगलात त्यांनी त पश्य र्या केली...