Posts

Image
  संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागामध्ये बार्टी पुरस्कृत एम.सी.ई.डी मार्फत मोफत “ हायटेक उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम ”   कोल्हापूर , ता. 29  :  डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे , पुरस्कृत महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र कोल्हापूर अंतर्गत दोन महिने कालावधीचा नि:शुल्क अनिवासी हायटेक उद्योजकता विकास प्रशिक्षण "आयटी ऑटोमेशन प्रोग्रामिंग आणि बेसिक जपानीज." संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग साह्य कॉम्प्युटर सायन्स अँड इंजीनियरिंग अंतर्गत कार्यक्रम सुरू होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील  इच्छुक युवक युवतीने कडून प्राप्त होणाऱ्या प्रवेश अर्जा मधून दोन महिने कालावधीच्या मोफत अनिवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमासाठी पात्र  30  उमेदवाराची प्रत्यक्ष मुलाखती द्वारे निवड करण्यात येणार आहे. तरी अनुसूचित जाती स्वयंसहायता गटातील स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने आपले आधार कार्ड ,  जातीचे प्रमाणपत्र ,...

संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये “कौशल्य विकास आणि शासकीय योजना, प्रशिक्षण कार्यक्रम” मार्गदर्शन व परिचय

Image
संजय घोडावत पॉलिटेक्निक मध्ये “कौशल्य विकास आणि शासकीय योजना, प्रशिक्षण कार्यक्रम” मार्गदर्शन व परिचय मेळावा.              जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त विविध मार्गदर्शन कार्यक्रम संजय घोडावत पॉलिटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्ग आयोजित शासकीय योजनातील प्रशिक्षण, कोर्सेस, कार्यशाळा, माहिती, जाणीवजागृती, मार्गदर्शन कार्यक्रम  ( सप्ताह ) दिनांक २५/०७/२०२२ ते ३०/०७/२०२२ या कालावधी मध्ये प्रशिक्षणा बाबत माहिती , मार्गदर्शन व प्रवेश अर्ज स्विकारण्यासाठी ६ दिवशीय परिचय कार्यक्रम संजय घोडावत युनिव्हर्सिटी कॅम्पस कोल्हापूर सांगली हायवे अतिग्रे ४१६११८ जिल्हा कोल्हापूर. येथे आयोजित करण्यात आला आहे.       सदर कार्यक्रमास उपस्थित व इच्छुकांना विविध तांत्रिक अभ्यासक्रम सीएनसी अँड व्हीएमसी ऑपरेटर, फौंड्री टेक्नॉलॉजी, वेल्डिंग असिस्टंट, ऑटोकॅड डिझायनर, कॉम्प्युटर हार्डवेअर अँड नेटवर्किंग, सोलार टीव्ही इन्स्टॉलर, डोमेस्टिक डाटा एन्ट्री ऑपरेटर, जीएसटी अकाउंट असिस्टंट. यासह सॉफ्ट स्किल्स व्यक्तिमत्त्व विकास , उ...

घोडावत पॉलीटेक्निकमध्ये बार्टी,एमसीईडी अंतर्गत एक महिना उद्योजकता विकास कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Image
  घोडावत पॉलीटेक्निकमध्ये बार्टी,एमसीईडी अंतर्गत एक महिना उद्योजकता विकास कौशल्य  प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात संपन्न : कोल्हापूर: डॉ. बाबसाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ,( बार्टी ) पुणे , आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र ( एमसीईडी ) यांच्या विध्यमानाने स्थापित - अनुसूचित जातीतील स्वयंसहायता युवा गटा करता एक महिन्याचे अनिवासी मोफत उद्योजगता विकास प्रशिक्षण कार्यक्रम कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, संजय घोडावत पॉलिटेक्निक दिनांक १५ जून २०२२ ते १६ जुलै २०२२ या कालावधीत प्रशिक्षण कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण झाला. आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रमासाठी कोल्हापूर जिल्ह्यातून बार्टी युवा गटातील ७० सुशिक्षित बेरोजगार युवक युवतीने नोंदणी करून मुलाखतीस उपस्थित होते त्यातील ३० लाभार्थींची निवड करण्यात आली. निरोप समारंभ कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी गणेश सावखंडे, प्रकल्प अधिकारी (बार्टी ) ,   प्रवीण कायंदे , प्रकल्प अधिकारी ( एमसीईडी) प्रा. अजय.बी. कोंगे, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, धीरज कवाळे, पूजा धोत्रे, सुनंदा मेटकर व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.   मार्...

घोडावत' मधून ५००० हुन अधिक विद्यार्थी झाले कौशल्य विकसित

Image
  घोडावत' मधून ५००० हुन अधिक विद्यार्थी झाले कौशल्य विकसित कोल्हापूर: संजय घोडावत शिक्षण संकुलाच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागांतर्गत आज अखेर ५००० हुन अधिक गरजू सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम, कार्यशाळा आणि जाणीव जागृती कौशल्य विकास मार्गदर्शन मेळाव्याच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील कौशल्याचे ज्ञान देऊन त्यांना कुशल बनविण्यात आले आहे. अशी माहिती विश्वस्त विनायक भोसले व कौशल्य विकास आणि उद्योजकता विभागाचे प्रमुख समन्वयक प्रा.अजय बी. कोंगे यांनी जागतिक युवा कौशल्य दिनाच्या निमित्ताने प्रसिद्धिप्रत्रकाद्वारे कळविली आहे. यामध्ये प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना, जिल्हा उद्योग केंद्र, सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटी, नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ सोलर एनर्जी, बार्टी, उद्योजकता विकास कार्यक्रम,एमसीइडी, मिटकॉन  व महिला आर्थिक विकास महामंडळ या शासकीय योजनेअंतर्गत मोफत विद्यावेतनासह सुशिक्षित बेरोजगारांचे  कौशल्य विकसित करून नोकरी व उद्योग उभारण्यासाठी सक्षम बनवि...

तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी* *-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*

Image
  *तरुणांनी उद्योग-व्यवसायातून उन्नती साधावी*    *-जिल्हाधिकारी राहुल रेखावार*   ◆  *उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमाला भरघोस प्रतिसाद*  ◆  *महिला नवउद्योजकांची लक्षणीय उपस्थिती*   कोल्हापूर, दि.29 (जिमाका): तरुण- तरुणींनी उद्योग क्षेत्राकडे वळावे. उद्योग-व्यवसाय उभारुन कुटुंबाची व जिल्ह्याची उन्नती साधावी, असे आवाहन करुन यासाठी कर्जपुरवठा व अन्य आवश्यक ते सर्व सहकार्य प्रशासनाच्या वतीने करण्यात येईल, अशी ग्वाही जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली.   जिल्हाधिकारी कार्यालय व इतर शासकीय विभागांच्या वतीने महासैनिक दरबार हॉल येथे आयोजित 'उद्योजक व नवउद्योजकांसाठी मार्गदर्शन कार्यक्रमा' चे उद्घाटन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते झाले, यावेळी ते बोलत होते.  यावेळी अल्पसंख्याक विकास महामंडळाअंतर्गत शैक्षणिक कर्ज मंजुरीचे पत्र जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी शक्ती कदम, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक गणेश गोडसे, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता केंद्राचे स...

करिअर मार्गदर्शन

Image
करियर मार्गदर्शन कार्यक्रम 2022-23  10 वी 12 नंतर काय सर्वच परीक्षा देलेल्या विद्यार्थांना पडलेला प्रश्नाचे अचूक  उत्तर विद्यार्थांना शोधून देण्यासाठी आयोजित करिअर मार्गदर्शन कार्यक्रम  चिराग कॉम्प्युटर्स वडणगे येथे MSCIT प्रशिक्षण घेत असलेल्या विद्यार्थांनासाठी  संजय घोडावत पॉलीटेक्निक, अतिग्रे येथे आज करीअर मार्गदर्शन मेळावा पर्व १८ वे आयोजित करण्यात आले होते. या करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात करीअर समुपदेशक कॉलेजचे प्राचार्य, प्रा. विराट गिरी यांचे मार्गदर्शन लाभले, करीअर मार्गदर्शन कार्यक्रमात 300+ पेक्षा जास्त इ. 10  वी ची परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुहास पाटील यांनी केले, करियर मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करून यशस्वीरीत्या पार पाडणेसाठी संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग प्रमुख प्रा. अजय बी. कोंगे  यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे उत्कृष्टरित्या नियोजन कॉलेजचे प्रवेश समन्वयक प्रा. नितीन जाधव यांच्या सोबत सर्व टिचिंग व नॉन टिचिंग स्टाफ यांचे सहकार्य मिळाले. आपणाकड...
Image
  आज दि ०९ जून २०२२ ,रोजी उद्योजकता विकास परिचय मेळावा(२) संजय घोडावत पॉलिटेक्निकल कॉलेज अतिग्रे ता .हातकणंगले जि. कोल्हापूर या ठिकाणी संपन्न झाला सदरच्या उद्योजकता विकास परिचय मेळावा साठी प्रमुख मान्यवर अग्रणी बँकेचे मॅनेजर मा.गणेश यादव तसेच संजय घोडावत पॉलिटेक्निकल कॉलेजचे प्राचार्य डॉ. विराज गिरी व एम सी डी चे प्रकल्प अधिकारी मा.प्रवीण कायंदे तसेच बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे, कौशल्य व उद्योजकता विकास केंद्राचे प्रमुख प्रा.अजय कोंगे उपस्थित होते. सदरच्या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाची प्रस्तावना बार्टी चे प्रकल्प अधिकारी गणेश सवाखंडे यांनी केले उद्योजकता विकास परिचय मेळाव्याचे मार्गदर्शन एम सी डी चे प्रकल्प अधिकारी प्रवीण कायंदे यांनी केले बँकांविषयी व सी एम जी पी योजनांविषयी माहिती अग्रणी बँकेचे गणेश यादव यांनी केले तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना संजय घोडावत कॉलेज चे प्राचार्य डॉ. विराज गिरी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थित युवकांच्या समस्यांचे निरासरण करण्यात आले. क...