आज जागतिक भूगोल दिन !
🌍 *🌍 १४ जानेवारी 🌍* *जागतिक भूगोल दिन* ******************************** आज जागतिक भूगोल दिन ! भूगोल महर्षी प्रा. चं. धुं. (सी.डी.) देशपांडे यांचा जन्मदिन हा 'भूगोल दिन' म्हणून पाळण्यात येतो. संपूर्ण जगामध्ये एखाद्या विषयाकडे खास लक्ष वेधून घेण्यासाठी त्या संबंधीचा ‘विशेष दिन’ साजरा करण्याकडे वाढती प्रवृत्ती दिसून येते. राज्यात १४ जानेवारी हा दिवस ‘भूगोल दिन’ म्हणून साजरा होऊ लागला त्याला या वर्षी ३२ वर्षे पूर्ण होत आहेत. शिक्षण क्षेत्रात व महाराष्ट्रात शालेय पातळीवर मोठय़ा उत्साहाने हा दिवस साजरा करतात. भूगोल महर्षी प्रा. चं.धुं. (सी.डी.) देशपांडे हे भूगोल या विषयाचे प्राध्यापक, महाराष्ट्राचे शिक्षण संचालक व दिल्ली पर्यंत नव्हे तर परदेशातही नावाजलेले भूगोलतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांनी विद्यार्थ्यांना भूगोलात आवश्यक असणारी मानव पर्यावरण सहसंबंधांबाबत सम्यक दृष्टी दिली. म्हणून त्यांच्या स्मृतीखातर सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या ७५व्या जन्मदिनी असे ठरविले की, भूगोल या अतिशय महत्त्वाच्या, पण दुर्लक्षित राहिलेल्या विषयासाठी दरवर्षी १४ जानेवारी हा दिन ‘भूगोल दिन’ म्हणू...