घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी अंतर्गत शालेय साहित्यांचे वाटप जयसिंगपूर : संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजण्याची वारी आली आपल्या दारी या सामाजिक उपक्रमांतर्गत आष्टा जि. प. शाळा नं.०९ वाळवा, सांगली प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असण्याऱ्या विद्यार्थ्यांना शालेय उपयुक्त साहित्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षणविस्तार अधिकारी वाळवा श्रीमती. मंगल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा सौ. मनिषा मोटकट्टे, शा.व्य. सदस्य श्री. राजाराम देसावळे, मॉडेल स्कुल कमिटी सदस्य श्री. साजिद आयुबखान इनामदार, वरिष्ठ मुख्याध्यापिका सौ. फरिदा रमजान मकानदार, सहशिक्षक श्री. दयानंद बाळासाहेब लोखंडे, श्री. समीर इसाक नायकवडी, उपशिक्षका सौ. निलम जगदिश साळुंखे, श्रीमती. शाहीन मुजावर, पालक, गावातील ग्रामस्थ आणि संजय घोडावत विद्यापीठाच्या सौजन्य वारी आली आपल्या दारी कार्यक्रम समानव्यक प्रा. अजय कोंगे, श्री. आशिष कुलकर्णी, श्री.सचिन देसाई, पूनम शिंदे, एरोस्पेस अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रम समन्वयक, प्रा. अजय कोंगे यांनी उपस्थितांना या कार्यक्रमाविषयी...