संजय घोडावत इन्स्टिट्यूट मध्ये पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न
संजय घोडावत इन्स्टिट्यूट अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवी, आयटीआय, शॉर्ट टर्म. सर्व विभागास विद्यार्थ्यांचा प्रवेशासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. पदवी अभियांत्रिकी आणि शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५” प्रेरणा कार्यक्रम उत्साहात संपन्न. कोल्हापूर : सौ. सुशीला दानचंद घोडावत चॅरिटेबल ट्रस्टच्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये शैक्षणिक वर्ष २०२५- २६ मध्ये डिप्लोमा, डिग्री, आयटीआय व शॉर्ट टर्म कोर्सेस या सर्व विभागांच्या प्रवेशासाठी संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर पदवी अभियांत्रिकी व शॉर्ट टर्म कोर्सेस “प्रारंभ-२५ प्रेरणा कार्यक्रम” संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त, विनायक भोसले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवात पालक प्रतिनिधी व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाली. यावेळी संस्थेचे संचालक डॉ. विराट गिरी, प्रथम वर्ष पदवी विभाग प्रमुख प्रा. सौ. शुभांगी महाडिक, शॉर्ट टर्म कोर्सेस विभाग प्रमुख प्रा. अजय कोंगे, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्य...