हार मानू नका – जीवन अचानक कोठूनही नवीन वळण घेत : प्रा. अजय बी. कोंगे

 



हार मानू नका – जीवन अचानक कोठूनही नवीन वळण घेत 

जीवन हे एखाद्या प्रवासासारखं आहे. अनेक वेळा आपण वाट चुकतो, अडचणीत सापडतो, थकतो... आणि वाटतं की आता काही उरलं नाही. पण तेच क्षण असतात, जे जीवनाला एक नवीन वळण देतात.

आशेचा किरण कुठूनही येऊ शकतो :

कधी एखादं छोटेसं प्रेरणादायी वाक्य, एखाद्याची मदतीची हात, किंवा तुमच्यातल्या आत्मविश्वासाचा क्षण – हे सगळं जीवनाला पुन्हा चालू करण्याचं सामर्थ्य देतं.

प्रत्येक अडथळा हे एक नवीन वळण :

प्रत्येक संकट हे काहीतरी शिकवून जातं. कधी वाटतं ही संधी नाही, पण नंतर समजतं की तीच खरी संधी होती. जिथे सगळं संपतंय असं वाटतं, तिथूनच नवी सुरुवात होते.

ध्येयावर लक्ष ठेवा :

आपल्याला काय हवं आहे, हे विसरू नका. यश तात्काळ मिळत नाही, पण प्रयत्नांची सातत्यपूर्ण ठिणगी अखेर मोठा प्रकाश निर्माण करते.

मन:शक्तीचा आधार घ्या :

शांत मन, सकारात्मक विचार, आणि आत्मविश्वास यांची साथ घेतली, तर कोणतंही वळण आपल्याला योग्य दिशेने घेऊन जातं.

उदाहरण:

थॉमस एडिसन यांनी १०,००० वेळा अपयश अनुभवूनही बल्बचा शोध लावला. ते म्हणाले होते, “मी १०,००० वेळा अपयशी झालो नाही. मी १०,००० मार्ग शोधले जे चालले नाहीत.”

आजचा अंधार उद्याचं उजेड घेऊन येतो. म्हणून हार मानू नका. जीवन अचानक कोठूनही नवीन वळण घेतं – फक्त थांबू नका. चालत राहा. नेहमी सत्कर्म करत राहा .... 

Skill

*मी उद्योजक होणार*

Two Day National level Workshop On E-Content Skill Development (Educational Video Production)