दहावी आणि बारावी नंतरच्या विविध करिअर संधी
दहावी आणि बारावी नंतरच्या विविध करिअर संधी.
प्रा. अजय बी. कोंगे
(एम.ए. एम.एड., शिक्षण समुपदेशक)
विभाग प्रमुख, डिपार्टमेंट ऑफ शॉर्ट-टर्म कोर्सेस,
संजय घोडावत इन्स्टिट्यूट, अतिग्रे, कोल्हापूर
शिक्षण हा केवळ पुस्तकापुरता मर्यादित न राहता, आपल्या आयुष्याच्या दिशादर्शक ठरतो. विशेषतः दहावी व बारावी ही टप्पे हे विद्यार्थ्यांच्या करिअरची दिशा निश्चित करणारे अत्यंत महत्त्वाचे टप्पे आहेत. या टप्प्यावर योग्य निर्णय घेतल्यास एक यशस्वी आणि समाधानी जीवन घडू शकते. आजच्या काळात केवळ डॉक्टर, इंजिनिअर किंवा वकील एवढ्यावर करिअर मर्यादित राहिलेले नाही, तर अनेक नवीन संधी व पर्याय विद्यार्थ्यांसमोर खुले झाले आहेत.
दहावी नंतरचे करिअर पर्याय
दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रांमध्ये प्रवेश घेता येतो:
1. तांत्रिक डिप्लोमा कोर्सेस (३ वर्षे)
इंजिनिअरिंग शाखा: मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर, ऑटोमोबाईल, मेकॅट्रॉनिक्स, एअरॉनॉटिकल इ.
डिप्लोमा केल्यानंतर lateral entry द्वारे थेट दुसऱ्या वर्षात इंजिनिअरिंग डिग्रीसाठी प्रवेश घेता येतो.
2. कृषी संबंधित कोर्सेस
Diploma in Agriculture, Horticulture, Animal Husbandry, Dairy Technology, Fisheries Science, Organic Farming
ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हे कोर्सेस उपयोगी ठरतात.
3. वैद्यकीय व आरोग्य सेवा क्षेत्र (१२वी Science नंतर)
DMLT, X-Ray Technology, Radiology, Operation Theatre, Pharmacy, Nursing, Physiotherapy इ.
4. संगणक व IT कोर्सेस
DCA, Web Designing, Software Engineering, Animation, Cyber Security, Data Science, AI, Game Development
5. हॉटेल मॅनेजमेंट आणि फूड इंडस्ट्री
Diploma in Hotel Management, Culinary Arts, Bakery & Confectionery, Food Production
6. कला व क्रिएटिव्ह क्षेत्र
Fashion Designing, Interior Designing, Fine Arts, Photography, Jewellery Designing
7. व्यवसाय, व्यवस्थापन व आर्थिक क्षेत्र
Retail Management, Financial Accounting, Digital Marketing, E-Commerce
8. ITI कोर्सेस व कौशल्य विकास
Fitter, Welder, Electrician, Diesel Mechanic, AC Mechanic, Plumbing, Carpentry इ.
9. १२वीची तयारी – Science, Commerce, Arts
पुढील उच्च शिक्षणासाठी दहावीनंतर बारावीचे कोणते प्रवाह निवडायचे हेही महत्त्वाचे आहे.
बारावी नंतरचे करिअर पर्याय
साइन्स शाखा:
प्रोफेशनल कोर्सेस: B.E/B.Tech (JEE/CET), MBBS, BDS, BAMS, BHMS, BPT (NEET), B.Pharm, B.Sc. IT, B.Sc. Agri.
इतर कोर्सेस: NDA, BCA, B.Sc. in Pure Sciences (Physics, Chemistry, Biology, Maths)
कॉमर्स शाखा:
B.Com, BBA, CA, CS, CMA, Hotel Management, Banking & Finance, E-Commerce.
आर्ट्स शाखा:
BA (History, Sociology, Psychology), Journalism, Law (LLB), Fine Arts, Performing Arts, BSW, Social Work, UPSC/MPSC स्पर्धा परीक्षा.
इंजिनिअरिंग क्षेत्रातील संधी
Computer Science & IT: Software, AI/ML, Cyber Security, Web/App Development.
Electronics & Communication: IoT, Embedded Systems, VLSI Design.
Mechanical/Automobile: CAD/CAM, Robotics, Manufacturing.
Civil: Structural Design, Construction Management, Environmental Engineering.
Electrical: Power Plants, Automation Systems, Renewable Energy (Solar, Wind).
डिप्लोमा इंजिनिअरिंगचे फायदे
कमी वेळात तांत्रिक ज्ञान
लवकर नोकरी मिळवण्याची संधी
सरकारी नोकऱ्यांमध्ये (PWD, MSEB, Railways, ISRO, DRDO) भरती
डायरेक्ट दुसऱ्या वर्षात इंजिनिअरिंग डिग्री
स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची संधी
कृषी क्षेत्रातील संधी
डिप्लोमा व पदवी अभ्यासक्रम:
Diploma/B.Sc. in Agriculture, Horticulture, Forestry, Fisheries Science, Veterinary Science
B.Tech in Agricultural Engineering
AgriBusiness Management
सरकारी नोकऱ्या व स्पर्धा परीक्षा:
कृषी अधिकारी, NABARD, IBPS AFO, MPSC Agriculture Services
खाजगी व स्टार्टअप संधी:
ग्रीनहाउस, ऑर्गॅनिक फार्मिंग, कृषी तंत्रज्ञान स्टार्टअप
सुवर्णसंधी कशा मिळवाव्यात?
इंटर्नशिप – शिक्षणादरम्यानच उद्योग क्षेत्रात अनुभव मिळवा.
ऑनलाइन कोर्सेस – Coursera, Udemy वर नवीन कौशल्ये शिका.
नेटवर्किंग – सेमिनार्स, हॅकाथॉन्स, करिअर फेअर्समध्ये सहभागी व्हा.
स्पर्धा परीक्षा तयारी – GATE, ISRO, DRDO, MPSC, UPSC साठी अभ्यास करा.